शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टीनचे कंत्राट देण्याच्या नावाखाली निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची २८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:23 IST

अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील कॅन्टीनचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांची २८ लाखांची फसवणूक करणाºया अकबर पाशा उर्फ रोहित शेट्टी (४९) याला चितळसर पोलिसांनी बुधवारी तळोजा कारागृहातून अटक केली.

ठळक मुद्दे अकबर पाशा याला अटक तळोजा कारागृहातून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील कॅन्टीनचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली निवृत्त सहायक आयुक्तांची २८ लाखांची फसवणूक करणाºया अकबर पाशा उर्फ रोहित शेट्टी (४९) याला चितळसर पोलिसांनी बुधवारी तळोजा कारागृहातून अटक केली. त्याला ४ जानेवारी २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त संजय सुर्वे (६१) यांचा मुलगा क्षितीज याने हॉटेल मॅनेजमेेंटचा कोर्स केला आहे. त्यामुळे एखादे हॉटेल भाडयाने चालविण्यासाठी सुर्वे हे पाहणी करीत होते. जून २०१५ ते मे २०१६ या काळात रोहित शेट्टी, भगवान पवार आणि त्याची पत्नी पल्लवी पवार यांनी अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील सुसज्ज कॅन्टीनचे कंत्राट सुर्वे यांच्या मुलाला मिळवून देण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाºयाशी आपला चांगला परिचय असल्याची बतावणी केली. थोडे प्रयत्न आणि काही पैसे खर्च केल्यास हे कंत्राट पाच वर्षांसाठी त्यांच्या मुलाला मिळवून देऊ शकतात, असा दावाही त्याने केला. हे कंत्राट फायदेशीर असल्याचे सांगून त्यांना काही रक्कम गुंतविण्यासाठी त्यांचे मन वळविले. या त्रिकुटावर विश्वास ठेवून सुर्वे यांनी काही रोकड आणि धनादेशाने अशी २८ लाखांची रक्कम त्यांना दिली. ही रक्कम मिळाल्यानंतरही रोहित किंवा त्याच्या इतर दोन्ही साथीदारांनी कंत्राट देण्याचे कोणतेही काम केले नाही. त्यानंतर सुर्वे यांनी त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करुनही त्याने ही रक्कम परत न करता त्याचा अपहार करुन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी सुर्वे यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. अशाच एका प्रकरणात कासारवडवली पोलिसांनी रोहित याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्याची तळोजा येथील कारागृहात रवानगी झाली होती. त्यानुसार ठाणे न्यायालयाच्या परवानगीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड आणि पोलीस निरीक्षक आर. बी. भिलारे यांनी तळोजा कारागृहातून ३० डिसेंबर २०२० रोजी त्याला ताब्यात घेतले. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक