शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ठाण्यातील ठेकेदाराची १८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 20:41 IST

सोशल मिडियावर बनावट खाते तयार करुन तसेच नकली फार्मा कंपनी स्थापन करून भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ठाण्यातील एका ठेकेदाराला १८ लाख ५० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या आठ जणांविरु द्ध ठेकेदाराने ११ फेब्रुवारी २०२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हाफेसबुकवर उघडले बनावट खाते

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सोशल मिडियावर बनावट खाते तयार करुन तसेच नकली फार्मा कंपनी स्थापन करून भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ठाण्यातील एका ठेकेदाराला १८ लाख ५० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रेस जॅक्सन आणि मनिष जैन सह आठ जणांविरु द्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.ठाण्यातील सावरकरनगरमधील ४९ वर्षीय ठेकेदाराची फसवणूक करण्यासाठी आठ जणांनी मिळून हा कट रचला होता. या फसवणुकीसाठी ग्रेस जॅक्सन, डेव्हिड टॅम, रॉलीन्स ओवेन, अ‍ॅश्ले मायकल, आजय मिश्रा आणि मनिष जैन आदी आठ जणांनी फेसबुकवर बनावट खाते उघडले होते. तसेच स्पेशालिस्ट हेल्थ केअर फार्मा या नावाने बनावट कंपनी तयार करून गुगल साईटवर ती लोड केली. शिवाय वेगवेगळया बँकांमध्ये त्यांनी खातेही उघडले होते. त्यांनतर त्यांनी भागीदारीमध्ये उद्योग, व्यवसाय करण्याचे अमिष या ठेकेदाराला दाखविले. कोणतीही औषध निर्मितीची कंपनी नसतानाही ती असल्याचे भासवत त्यांनी या ठेकेदाराकडून तब्बल १८ लाख ५० हजार रु पये उकळले. त्यांनी हे पैसे त्याला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये भरण्यास सांगितले होते. फसवणुकीचा हा प्रकार २ फेब्रुवारी २०२० ते २७ फेब्रुवारी २०२० या काळात सुरु होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या आठ जणांविरु द्ध ठेकेदाराने ११ फेब्रुवारी २०२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी