शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

वित्तीय कंपनीचा वितरक असल्याचे भासवून १८ लाखांची फसवणूक: टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 23:54 IST

बजाज फायनान्स या कंपनीचे अधिकृत डीलर असल्याची बतावणी करुन १८ लाख ६१८ रुपयांचे मोबाईल खरेदी करुन फसवणूक करणाऱ्या मोहम्मद अल्तामश याच्यासह तिघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाखांचे ३० मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईसात लाख १३ हजारांचे मोबाईल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बजाज फायनान्स या कंपनीच्या अधिकृत डीलरचे आयडी आणि पासवर्डचा वापर करुन ओपन व्हर्च्युअल कार्ड वेगवेगळया ग्राहकांच्या नावाने बनवून त्याद्वारे १८ लाख ६१८ रुपयांचे मोबाईल खरेदी करुन फसवणूक करणाºया मोहम्मद अल्तामश याच्यासह तिघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख १३ हजारांचे 30 मोबाईल हस्तगत केले आहेत.बजाज फायनान्स कंपनीचे ठाण्यातील वागळे इस्टेट येथे कार्यालय आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०२० या कालावधीत मुंब्रा येथील अल्तामश उनावाला याने बजाज फायनान्स कंपनीचा अधिकृत वितरक नसतांनाही अन्सार टॉवेलवाला (३५, रा. मुंब्रा, ठाणे) आणि दीपेन राजेंद्र सोमया (३१, रा. मुलुंड) यांच्या मदतीने ही फसवणूक केली. या टोळीने बजाज फायनान्स कंपनीचे राजस्थान, पंजाब, बिहार आदी राज्यातील अधिकृत डीलर यांचे लॉगीन आयडी तसेच पासवर्ड वापरून वेगवेळया ग्राहकांच्या नावाने ओपन व्हर्च्युअल कार्ड बनविले. याच कार्डच्या मदतीने या टोळक्याने तब्बल १८ लाख १८ हजार ६१८ रुपयांचे मोबाईल कर्जाने खरेदी करुन कंपनीची दिशाभूल केली. याप्रकरणी ठाण्यातील वागळे स्टेट पोलीस ठाण्यात कंपनी व्यवस्थापनाने १३ नोव्हेंबर २०२० रोजी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा समांतर तपास वागळे इस्टेट पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत होते. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, हवालदार आबुतालीब शेख, सुभाष मोरे, सुनिल जाधव आणि चंद्रकांत वाळूंज आदींच्या पथकाने या तिघांनाही १३ नोव्हेंबर रोजी मुंब्य्रातून अटक केली. त्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. मोहम्मद अल्तामश हा बजाज फायनान्स कंपनीचा पूर्वाश्रमीचा डीलर होता. त्याच्याकडून विकलेल्या मोबाईलची कर्ज वसूली होत नसल्याने कंपनीने त्याची डीलरशीप काढून घेतली होती. त्यानंतर त्याने कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आरोपींकडून आतापर्यंत सात लाखांचे विविध कंपन्यांचे ३० मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी