शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीला लावण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक: मध्यप्रदेशातील ठकसेनाला सांगलीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 22:22 IST

रेल्वेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली मध्यप्रदेशातील अनेक तरुणांना सुमारे एक कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या टोळीतील नितीन पाटील उर्फनितीन आकाराम बारपटे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी पहाटे अटक केली. त्याच्यावर मध्यप्रदेश पोलिसांनी पाच हजारांचे बक्षिस जाहिर केले होते.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईमध्यप्रदेश सरकारने घोषित केले होते पाच हजारांचे बक्षिस

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रेल्वेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली मध्यप्रदेशातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सुमारे एक कोटींचा गंडा घालून नितीन पाटील उर्फ नितीन आकाराम बारपटे (३४) हा पसार झाल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याला अटक केली.मध्यप्रदेश सरकारने पाच हजारांचे बक्षिस घोषित केलेल्या नितीन याने ग्वाल्हेर भागातील १५ ते २० तरुणांकडून प्रत्येकी चार ते पाच लाखांची रक्कम रेल्वेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली घेतली होती. प्रत्यक्षात त्याने कोणालाही नोकरीला लावले नाही. तसेच त्यांचे पैसेही परत केले नाही. याप्रकरणी २०१९ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीनच्या साथीदाराला ग्वाल्हेर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जानेवारी २०२० मध्ये अटक केली होती. नितीन मात्र त्यांना हुलकावणी देत होता. तो नवी मुंबईतल्या नेरु ळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्वाल्हेरच्या पोलीस अधीक्षकांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना या तपासात मदतीसाठी पत्र दिले होते. नितीन हा त्याच्या मुळगावी कामेरी (जिल्हा- सांगली) येथे असल्याची माहिती पोलीस नाईक अमोल देसाई यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांच्या पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने त्याला २३ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास कामेरी येथून अटक केली.त्याला ठाणे न्यायालयाने ५ आॅक्टोबरपर्यन्त न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याला पुढील तपासासाठी गवाल्हेर पोलिसांच्या ताब्यात देण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.* यापूर्वीही याच फसवणूकीच्या गुन्हयातील तुफेल मोहम्मद आणि सुलेमान शेख या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मुंब्रा येथून अटक करण्यासाठीही मध्यप्रदेश पोलिसांना मदत केली होती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी