शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ-बदलापूरला चौदाव्या वित्त आयोगाचे ५३.५३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:35 IST

नगरविकासला मुहूर्त सापडला : दोन वर्षांपासून रखडले होते अनुदान

ठाणे : १४ व्या वित्त आयोगांतर्गत अखेर २०१७-१८ चे अनुदान वितरीत करण्यास राज्य शासनास मुहूर्त सापडला असून त्यानुसार राज्यातील ९४ स्थानिक स्वराज्य संस्थांना ५५० कोटी ९१ लाख रुपयांचे अनुदान वितरीत केले आहे. यात अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या वाट्याला ५३ कोटी ५३ लाख ६५ हजार ३० रुपये आले आहेत.

शहराची लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारे हे अनुदान पायाभूत सुविधांसाठी वितरीत करण्यात येते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून केंद्राकडून ते मिळालेले नव्हते. अखेर २७ आॅगस्ट रोजी ते नगरविकास विभागाकडे जमा झाल्यानंतर बुधवारी ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यात वर्ग केले. अंबरनाथ नगरपालिकेच्या वाट्याला ३१ कोटी ५२ लाख २९ हजार ५२३ रुपये तर बदलापूरच्या हिश्याला २२ कोटी एक लाख ३५ हजार ५०७ रुपये आले आहेत.५० टक्के रक्कम स्वच्छ भारतसाठी खर्चाचे बंधनकेंद्र शासनाकडून १४ व्या वित्त आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानापैकी ५० टक्के रक्कम हीजिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने घनकचºयाचे संकलन, वाहतूक, त्यावरील प्रक्रियेसह शौचालये बांधकाम, वनीकरणावर खर्च करण्याचे बंधन आॅगस्ट २०१५ मध्ये नगरविकास विभागाने घातले आहे. तसेच हागणदारीमुक्त झालेल्या ठिकाणांचे सौंदर्यीकरण, सुशोभिकरणासह शौचालयांच्या दुरुस्तीवर खर्च करावी, असे स्पष्ट केले आहे. यामुळे अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकांना यातील २६ कोटी ७६ लाख ८२ हजार ५१५ रुपये यावर खर्च करावी लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका