शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:57 IST

शेजारची लहान मुले दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली.

मीरा रोड : शेजारची लहान मुले दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेजारी राहणाºया १९ वर्षाच्या तरूणास अटक केली आहे.आझादनगरला पालिकेच्या भूखंडावर बेकायदा झोपड्या, बांधकामे, कचºयाची गोदामे आहेत. तेथील कच्च्या झोपडीत इसरार शेख हे पत्नी, दोन मुले, दोन मुलींसह राहतात. शेजारच्या झोपड्यात काही कचरा - भंगार गोळा करणारे एकत्र राहतात. इसरार यांची मुले लहान असल्याने ते लघुशंका आदी शेजारच्या झोपड्यांजवळ करत असल्याने त्यावरून रहिम शौकत अली शेख (१९) याचे इसरार याच्याशी भांडण होत असे. रहीम हा लहान मुलांना देखील दमदाटी, शिवीगाळ करत असे.मंगळवारी रात्री इसरार यांची ४ वर्षाची मुलगी आफरीन ही दिसत नसल्याने घरच्यांसह परिसरातील रहिवाशांनी तिच्या शोधासाठी धापवळ सुरू केली. आफरीन बेपत्ता असल्याचे नवघर पोलिसांना कळवले. त्यांनीही शोधाशोध सुरु केली. त्याचवेळी रहीमसुध्दा बेपत्ता होता.आझादनगर मस्जिद मागील कचºयाच्या ढिगाºयातून विव्हळण्याचा आवाज तेथील एका रहिवाशाला आल्यानंतर पोलीस व अन्य लोकांनी धाव घेत पाहणी केली असता आफरीन ही जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आढळली. तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्या डोक्यावर, चेहºयावर जखम झालेली आहे. डोक्याला पाच ठिकाणी जखमा झाल्या आहेत.पोलीस व रहिवाशी हे रहीमचा शोध घेत असताना अनिस खान उर्फ मुन्ना, सलीम मनिहार आदींना रहीम हा क्रीडा संकुलामागील भागात लपलेला दिसला. नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आफरीन रात्री लघुशंकेसाठी गेली असता रहीमने तिला हटकले व रागाच्या भरात डोक्यावर रॉडने मारले. नंतर तिला कचºयात टाकून दिल्याची कबुली दिली.हत्या व गुन्ह्यांना महापालिका जबाबदार ?आझादनगर व मागील परिसर हा खेळाचे मैदान, सामाजिक वनीकरण या आरक्षणाखाली राखीव असून मोठ्या प्रमाणात पालिकेने टीडीआर देऊन जागा मिळवली आहे. परंतु या ठिकाणी झोपड्या, बांधकामे, भंगार व कचरयाची गोदामे आदींचे सर्रास अतिक्रमण झालेले असतानाही पालिका मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत या अतिक्रमणांना पाठीशी घालत आहे.याआधी ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करून मृतदेह याच भागात टाकला होता. पवई येथून अपहरण करून आणलेल्या १० वर्षाच्या मुलासही येथे मारुन टाकले होते.तरीदेखील पालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले नसून भूखंडदेखील कुंपण घालून ताब्यात घेतलेला नाही. पालिकेच्या डोळेझाक पणामुळे येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे मात्र सतत घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा