शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड येथील चार वेठबिगार मजुरांची भिवंडीत महसूल विभागाने केली मुक्तता

By नितीन पंडित | Updated: February 2, 2024 18:22 IST

दोन अल्पवयीन मजुरांचा समावेश असून मालक व मजूर पुरविणारा एजंट अशा दोघांविरोधात पडघा पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

भिवंडी: ठाणे जिल्ह्यात वीटभट्टी मालकां कडून आदिवासी मजुरांची वेठबिगार म्हणून आर्थिक व शारीरिक पिळवणूक करण्याचे प्रकार समोर येत असताना,परराज्यातून भिवंडी येथे मोबदला न देता चार महिन्यां पासून मजुरीच्या कामासाठी डांबून ठेवलेल्या चार मजुरांची भिवंडी तहसीलदार कार्यालयाने मुक्तता केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये दोन अल्पवयीन मजुरांचा समावेश असून मालक व मजूर पुरविणारा एजंट अशा दोघांविरोधात पडघा पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

छत्तीसगड राज्यातील सुरजपुर जिल्ह्या च्या भैयाथान तालुक्याच्या साबारावा या ग्रामीण गावातील आदिवासी गौड जातीचे इंद्रपाल जगन्नाथ सिंग वय ३०,मनबोध धनीराम वय ४९,बादल सोवित सिंग वय १४ व विकेश उत्तमसिंग वय १७ यांना मजूर पुरवठा करणारा एजंट शर्मा याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या चार जणांना तामिळनाडू राज्यातील कविन मनिवेल यांच्याकडे बोअरवेल गाडीवर खोदकाम करण्यासाठी मजुरीच्या कामावर चार महिन्यां पूर्वी लावले.तामिळनाडू येथील काम संपवून या कामगारांना बोअरवेल गाडीचा मालक केविन भिवंडी तालुक्यातील पडघा येथे एम एस ई बी च्या कामासाठी आणून ठेवले होते. दरम्यानच्या काळात या कामगारांना घरी जाऊ देत नव्हता व कामाचे पैसे ही देत नसल्याने इंद्रपाल याची पत्नी राजकुमारी हिने सुरजपुर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करीत आपल्या पतीस मालक कविन मनिवेल याने डांबून ठेवल्याची तक्रार केली.

सुरजपुरचे जिल्हाधिकारी यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे तात्काळ मजुरांच्या सुटकेची कार्यवाही करण्याबाबत कळविले.ठाणे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार अभिजित खोले यांना या बाबत आदेश दिले.व त्यानंतर पडघा येथील मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी स्थानिक पडघा पोलिसांच्या मदतीने मजुरांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता ते पडघा येथील एमएसईबी पॉवर हाऊस याठिकाणी रात्री साडे आठ वाजता पॉवर  हाऊसचे सबस्टेशनचे ठिकाणी विज लाईनचे आरथींग करीता खड्डे खोदण्याचे काम हे मजूर करीत असल्याचे समजले .त्याठिकाणी जावून या सर्व मजुरांना ताब्यात घेत त्यांना पडघा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोअरवेल गाडीचा मालक केविन मनिवेल व एजंट शर्मा या दोघांविरोधात वेठबिगार बंधमुक्त व बाल कामगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीChhattisgarhछत्तीसगड