शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मॅजिक पेनने गंडा घालणारे चौघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 03:54 IST

ठाणे पोलिसांची कामगिरी; आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

ठाणे : कर्ज मिळवून देतो, असे सांगून घेतलेल्या रद्द धनादेशांवर मॅजिक पेन आणि बोगस पॅनकार्डद्वारे बँकेतून रक्कम काढणाऱ्या एका चौकडीला ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा गुन्हा बोगस पॅनकार्डमुळे उघडकीस आला असून या चौकडीकडून विविध मोबाइल कंपन्यांची २१ सीमकार्ड, १५ जणांचे बेअरर चेक, बँकेची बनावट ओळखपत्रे, दोन बोगस पॅनकार्ड आणि चार जणांच्या कर्ज प्रकरणांची कागदपत्रे आदींसह फसवणूक केलेली ४० हजारांची रोकडही हस्तगत केली आहे. तसेच त्यांनी ठाणे, मुंबईतही फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांना ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशा प्रकारे आमिष दाखवणाºया भामट्यांच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये, किंबहुना कुणाची फसवणूक झाली असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यांत तक्र ार दाखल करावी, असे आवाहन उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.मुख्य सूत्रधार प्रसन्ना सावंत हा २०१४ पासून घराबाहेर असून तो कुटुंबीयांच्या संपर्कात नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळताच त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या टोळीने वागळे इस्टेट, साकीनाका आणि घाटकोपर येथील नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे.रोहित परिहार (३६) रा. कावेसर, घोडबंदर , संजय दुबे (३५) रा. नवी मुंबई, मूळगाव उत्तर प्रदेश, प्रसन्ना सावंत (२५) रा. नवी मुंबई आणि रणजित सिंग (३५) रा. नवी मुंबई अशी चौकडीची नावे आहेत.आरोपींनी ठाण्यातील व्यावसायिक सुनील काळे (४८) यांच्या पत्नीने व्यक्तिगत कर्ज घेण्यासाठी विविध बँकांमध्ये केलेल्या आॅनलाइन अर्जांची माहिती काढली.बँकेचे एजंट असल्याचे भासवून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्जमंजुरीसाठी लागणारे काही दस्तावेज आणि दोन रद्द धनादेश घेतले होते. या रद्द धनादेशांवर मॅजिक पेनने केलेल्या खुणा खोडून या चौकडीने सरजोत जैन नामक व्यक्तीचे बनावट पॅनकार्ड दाखवून तक्रारदारांच्या बँकेतून ४० हजारांची रक्कम काढली होती.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिस