शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मुद्रांक खाडाखोडप्रकरणी चार पदाधिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: December 28, 2015 02:28 IST

एम-२० फॉर्म भरण्याकरिता २०११ साली खरेदी केलेल्या गैर न्यायिक मुद्रांक पेपरवर खाडाखोड करून ते २००८ सालचे भासवल्याप्रकरणी भार्इंदरच्या एका गृहनिर्माण संस्थेच्या

मीरा रोड : एम-२० फॉर्म भरण्याकरिता २०११ साली खरेदी केलेल्या गैर न्यायिक मुद्रांक पेपरवर खाडाखोड करून ते २००८ सालचे भासवल्याप्रकरणी भार्इंदरच्या एका गृहनिर्माण संस्थेच्या चौघा पदाधिकाऱ्यांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. एका महिला पदाधिकाऱ्याचा शोध सुरू असून सदर मुद्रांक पेपर नोटरी व साक्षांकित करणारा वकील व एक तत्कालीन नगरसेविका अडचणीत येण्याची शक्यता आहे. माहिती अधिकारात संस्थेच्याच रहिवाशाने हा प्रकार उघड केला. भार्इंदर पश्चिमेस जनतानगर मार्गावर (शिवसेना गल्ली) संगम नावाची गृहनिर्माण संस्था आहे. बिल्डिंग क्र . १ मध्ये राहणारे किशनकुमार डागा (५७) यांना मार्च २०११ मध्ये संस्थेच्या कार्यकारिणीने मुद्रांक पेपर खरेदीसाठी तब्बल २३ हजार रु पये खर्च दाखवून तेवढी रक्कम घेतल्याचे समजले. संशय आल्याने डागा यांनी माहिती अधिकारात ठाणे उपनिबंधक कार्यालयाकडून कमिटीने सादर केलेले एम-२० च्या मुद्रांक पेपरवरील अर्ज मिळवले. त्यावर, ४ आॅगस्ट २००८ अशा तारखा नमूद होत्या. तारखांची खाडाखोड दिसल्याने डागा यांनी मुंबईच्या मुद्रांक कार्यालयाकडे त्याची माहिती मागवली असता ते जानेवारी व फेब्रुवारी २०११ मध्ये वितरीत झाल्याचे उघड झाले. मुद्रांक पेपरवर फेरफार करून बनावट दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो ठाणेनगर पोलीस ठाण्यास वर्ग केला होता. २१ नोव्हेंबर २०१५ रोजी ठाणेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष उमेश शाह, सचिव रमेश पटेल, खजिनदार दिनेश मिस्त्री व सभासद हितेशभाई शाह या चौघांना १९ डिसेंबर रोजी अटक केली. आज मंगळवारी आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. (प्रतिनिधी)