शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी रेल्वे पुलावरील चार लेन अखेर सुरु; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 17:42 IST

शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास यातील दोन - दोन अशा चार मार्गीका सुरु करण्यात आल्या आहेत.

ठाणे  : ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूकीसाठी महत्त्वाच्या असलेला कोपरी रेल्वे पूलाच्या अतिरिक्त मार्गिका अखेर शनिवारी ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरु करण्यात आल्या. त्यामुळे आता या भागात होणारी वाहतुक कोंडी फुटणार आहे. तर उर्वरीत मार्गिका या वर्षभराच्या आत सुरु केल्या जातील असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पूलाच्या सदोष कामांमुळे या मार्गिकांचे परिक्षण आयआयटीकडून करण्यात येत होते. त्यामुळे मार्गिकाचे उद्घाटन लांबले होते. एमएमआरडीएकडे आयआयटीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता या नव्या मार्गिका खुल्या करण्यात आल्या आहेत.

शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास यातील दोन - दोन अशा चार मार्गीका सुरु करण्यात आल्या आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरून दिवसाला हजारो वाहने मुंबई-ठाण्याच्या दिशेने ये-जा करत असतात. या मार्गिकेवरील कोपरी रेल्वे पूल हा अत्यंत अरु ंद असल्याने दररोज सकाळी आणि रात्नीच्या वेळेत पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना सहन करावा लागतो. तसेच मुंबई आयआयटीनेही हा पूल जुना झाल्याने पूलाची दुरूस्ती करण्याची सूचना केली होती. त्यानुसार, २०१८ मध्ये या मार्गावर पूलाची उभारणी तसेच अतिरिक्त मार्गिका तयार करण्याचे काम एमएमआरडीए आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. मध्य रेल्वेकडून रेल्वे रूळांवरील भागाची बांधणी केली जात आहे. तर, एमएमआरडीएकडून पोहोच रस्त्याचे काम केले जात आहे.

जून महिन्यात येथील ठाण्याच्या दिशेने येणारी आणि मुंबईच्या दिशेने जाणारी अतिरिक्त मार्गिका उभारण्यात आलेली आहे. त्याचवेळी या पूलाच्या उद्घाटनाची तयारीही शिवसेनेने केली होती. असे असताना एकही वाहन धावले नसताना या पूलावर तडे गेल्याचे तसेच रस्ता असमान झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर मुंबई आयआयटीने या पूलाचे परिक्षण करण्यास सुरूवात केली होती. जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत येथील वाहतूक सोडणो शक्य होणार नव्हते. त्यानंतर आयआयटीने एमएमआरडीएला पूलावर काही दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या. या दुरूस्त्या केल्यानंतर चार दिवसांपूर्वी आयआयटीने एक प्राथमिक अहवाल एमएमआरडीएला सादर केला आहे. या अहवालानंतर आता एमएमआरडीएने कोपरी पुलाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, स्थायी समिती सभापती संजय भोईर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.या उड्डाणपुलामुळे लाखो वाहनांना फायदा होणार आहे. त्यानुसार 8 पैकी दोन - दोन अशा चार लेन सुरु करण्यात आल्या आहेत. नाशिक, मुंबई, जेएनपीटीकडे जाणा:या वाहनांसाठी याचा फायदा होणार आहे. उर्वरीत मधल्या चार लेनचे काम रेल्वे आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु होणार असून ते काम वर्षभराच्या आत पूर्ण केले जाईल. यासाठी लागणारे गर्डर देखील आलेले आहेत, त्यानुसार हे काम लवकरच सुरु होऊन ते पूर्ण केले जाईल. या पुलाच्या कामात कोणताही तांत्रिक मुद्दा राहिलेला नाही. सर्व सोपास्कार पूर्ण करुन येथील चार लेन खुल्या करण्यात आलेल्या आहेत. (एकनाथ शिंदे - पालकमंत्री - ठाणे जिल्हा)

आता जुन्या पुलाचे शिवधनुष्य

या पूलाच्या बांधकामाचे कंत्नाट एमएमआरडीएने रेलकॉन या कंपनीला दिलेले आहे. अतिरिक्त मार्गिका वाहतूकीसाठी सुरू झाल्यानंतर मुख्य मार्गिका म्हणजेच, जुन्या पूलाचे काम एमएमआरडीए आणि रेल्वेकडून केले जाणार आहे. जुन्या पुलाचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण होणार असल्याची घोषणा पालकमंत्नी एकनाथ शिंदे यांनी केली होती. या घोषणोस आता दोन महिने उलटले आहेत. असे असले तरी या कामास आता एक वर्ष जाईल असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे