शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण योजनेत गुंतवणूकीचे अमिष दाखवून चार लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:24 IST

सुवर्ण योजनेनुसार १५ महिने गुंतवणूक केल्यास मुद्दल अधिक व्याज अशी रक्कम परतावा किंवा सोन्याचे दागिने देण्याचे गुंतवणूकदारांना अमिष दाखविले होते. यातील कोणतीच रक्कम परत न केल्यामुळे गुंतवणूकदारांची दखल घेऊन नौपाडा पोलिसांनी संतोष शेलार याला अटक केली.

ठळक मुद्देभामटयास अटक१०० ते १५० जणांना घातला गंडानौपाडा पोलीसांची कामगिरी

ठाणे : सुवर्ण योजनेमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून १०० ते १५० गुंतवणूकदारांना चार लाख १७ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या संतोष शेलार या ठाण्यातील सराफाला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पातलीपाडा येथील त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक संतोष शेलार (५१) याने आपल्या दुकानामार्फत सोन्याच्या योजनेत गुंतवणुकीची योजना सुरु केली होती. या योजनेनुसार १५ महिने गुंतवणूक केल्यास मुद्दल अधिक व्याज अशी रक्कम परतावा किंवा सोन्याचे दागिने देण्याचे गुंतवणूकदारांना अमिष दाखविले होते. रामचंद्रनगर, वैतीवाडी येथील रहिवाशी असलेल्या प्रिया जाधव यांच्यासह त्याने अनेकांना या योजनेचे प्रलोभन दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात त्याने ही योजना राबविली. प्रिया आणि त्यांचा मुलगा यांच्याकडून प्रति महिना एक हजार रुपये असे १५ महिने ३० हजार रुपये घेतले. मोठ्या विश्वासाने या रकमेची गुंतवणूक करूनही शेलार याने त्यांना सुवर्ण योजनेतील रक्कम किंवा सोन्याचे दागिनेही परत केले नाही. अशाच प्रकारे त्याने सुमारे १०० ते १५० गुंतवणूकदारांनाही गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जाधव यांच्यासह अनेकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात २७ जून २०१९ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या पथकाने अटक केली. त्याने १५ महिन्यांमध्ये १५ हजार रुपये तसेच व्याजाचे तीन हजार असे प्रत्येकी १८ हजार रुपये किंवा त्याच भावातील सोन्याची वस्तू देण्याचे अमिष दाखवूनही ती न देता जाधव यांच्यासह अनेकांची चार लाख १७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. यात आणखी १०० ते १५० जणांची फसवणूक झाल्याचेही समोर आले असून फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शेलार याने अपहार केलेली रक्कम इतर कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे, तसेच त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी