शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:23 IST

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केद्राची अकादमी सुरु करुन तिथे रेल्वेत तिकीट तपासणीसाची हमखास नोकरीचे अमिष दाखवून एका तरुणीला चार लाखांचा गंडा घालणाऱ्या संजय भोसले आणि जोत्स्रा साळसकर या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणेनगर पोलिसांची कारवाई पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची अकादमी स्थापली महिलेच्या नावाने वटविला धनादेश

ठाणे: रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस या पदावर नोकरीस लावण्याच्या नावाखाली ठाण्याच्या वागळे इस्टेट, श्रीनगर भागातील २६ वर्षीय महिलेची फसवणूक करणा-या संजय भोसले (४९, रा. मोहने , कल्याण) आणि जोत्स्रा साळसकर (४०, रा. कल्याण) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील तरुणीने कल्याणच्या भोसले अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. तिथेच संजय भोसले यांनी तिला रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून नोकरीला लावण्याचे अमिष दाखविले. त्यापोटी तिच्याकडून चार लाखांचा धनादेश घेऊन तो ४ डिसेंबर २०१८ रोजी ज्योत्स्रा साळसकर यांच्या नावाना वटविला. २०१७ पासून डिसेंबर २०१८ या काळात त्याच्यात हा व्यवहार झाला होता. वारंवार मागणी करुनही या तरुणीला नोकरी किंवा पैसेही त्याने परत केले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी १० डिसेंबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टी. एच. बच्छाव यांच्या पथकाने भोसले आणि साळसकर या दोघांना अटक केली. त्यांनी आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी