शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

हनी ट्रॅप लावून सहा लाख ९० हजारांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह चाैघे जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Updated: May 14, 2023 23:04 IST

चाकूच्या धाकाने व्यावसायिकाला लॉजवर ठेवले डांबून : श्रीनगर पाेलिसांची कारवाई

ठाणे : हनी ट्रॅप लावून ठाण्यातील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाकडून सहा लाख ९० हजारांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह चाैघांना जेरबंद केल्याची माहिती श्रीनगर पाेलिसांनी रविवारी दिली. त्याला या टोळीने भिवंडीतील एका लॉजवर चाकूच्या धाकावर डांबून ठेवले होते. चाैघांनाही १७ मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

या व्यावसायिकाने सुमारे सात लाखांची खंडणी दिल्यानंतरही त्याच्या वागळे इस्टेट येथील दुकानात हे टाेळके पुन्हा पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती श्रीनगर पाेलिसांना मिळाली. त्याचआधारे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक किरण काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक नितीन हांगे, पाेलिस हवालदार चंद्रकांत सकपाळ, पाेलिस नाईक रूपाली वंजारी, नितीन शेळके आणि राकेश पवार आदींच्या पथकाने १३ मे राेजी सकाळी या महिलेसह चाैघांनाही अटक केली.

या व्यावसायिकाने पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०२३ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १२ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हा खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि लुटीचा प्रकार सुरू होता. यातील शीतल लांजेकर (२७, रा. भांडूप, नावात बदल) या महिलेने या व्यावसायिकाला आधी मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर समीर मांजरेकर (रा. भांडूप), आदित्य गुप्ता (रा. किसननगर, वागळे इस्टेट, ठाणे), राहुल यादव (रा. मुलुंड) आणि त्यांचा अन्य एक साथीदार यांच्याशी संगनमत करून शीतलबराेबर अनैतिक संबंध असल्याची भीती दाखवली. नंतर त्याचे अपहरण करून भिवंडीतील मानकोली येथील लॉजवर नेऊन डांबून ठेवले.

त्याची स्कूटरही त्याच्याकडून जबरदस्तीने हिसकावून समाजात बदनामी करण्याची भीती दाखवली. चाकूच्या धाकावर या व्यावसायिकाच्या मोबाइलमधून दीड लाख रुपये ऑनलाइन काढण्यात आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशातून २५ हजार रुपये, एटीएममधून १५ हजार रुपये आणि पाच लाख रुपये अशा सहा लाख ९० हजारांच्या खंडणीसह स्कूटर असा सात लाख १५ हजारांचा मुद्देमाल बळकावला.सापळा लावून केली अटकशीतलबराेबर अनैतिक संबंध असल्याचे दाखवून बदनामीची भीती घालून हे टाेळके १३ मे राेजी वागळे इस्टेट येथील या व्यावसायिकाच्या दुकानात खंडणीसाठी आले. त्याचवेळी सापळा लावून पाेलिसांनी या टाेळक्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी खंडणीसह जबरी चाेरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेhoneytrapहनीट्रॅप