शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून चौघे सराईत सोनसाखळी चोरटे जेरबंद: चोरीसह आठ गुन्हयांची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 00:02 IST

चोरी, घरफोडी तसेच जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या ऋतिक सिताफराव आणि प्रतीक सिताफराव या दोन भावांसह चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून ८८ ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन मोटारसायकली आणि ११ हजारांची रोकड असा चार लाख ४५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कारवाई आरोपींमध्ये दोन भावांचाही समावेश चार लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चोरी, घरफोडी तसेच जबरीने सोनसाखळी चोरणाºया ऋतिक सिताफराव उर्फ भाई (१९, रा. कोपरी, ठाणे), प्रतीक सिताफराव उर्फ भावडया (२१, रा. कोपरी, ठाणे), वैभव प्रकाश गवळी उर्फ बच्ची (२६, रा. अंबरनाथ) आणि राकेश प्रेमचंद गुरु दासानी उर्फ राक्या (२६, रा. कशेळी, भिवंडी) या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाण्याच्या परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून आठ गुन्हयांमधील चार लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.नौपाडा परिसरामध्ये लॉकडाऊनच्या काळात एक सोनसाखळी जबरी चोरीची घटना घडली होती. अनलॉकनंतरही दोन जबरी चोरीच्या घटना नोंद झाल्या. या घटनांचा तपास करण्याचे तसेच अशा गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयांचा तपास सुरु होता. त्याचवेळी सोनसाखळी जबरी चोरीतील दोघेजण ठाण्याच्या ब्रम्हांड भागात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ३० नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या ब्रम्हांड भागातून ऋतिक आणि प्रतिक या दोघांना उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवालदार महेश भोसले, पोलीस नाईक सुनिल राठोड, संजय चव्हाण, विलास चडचणकर, हरिष तावडे, प्रशांत निकुंभ, भागवत थविल, गोविंद पाटील आणि गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने अटक केली. त्यांच्या चौकशीतून त्यांचा तिसरा साथीदार वैभव यालाही त्याचदिवशी ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ राकेशला १ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तीन ठिकाणी चोरी, सोनसाखळी जबरी चोरीच्या तीन आणि एका ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर त्यांनी नौपाडा आणिर विरार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून आतापर्यंत आठ गुन्हे उघड झाले आहेत. त्यांच्याकडून ८८ ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन मोटारसायकली आणि ११ हजारांची रोकड असा चार लाख ४५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे उपायुक्त अंबुरे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी