शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संतत धार पावसात विजेच्या धक्क्याने चार शेळ्या जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 18:29 IST

शेळ्या गावाशेजारील जंगलात चारण्यासाठी मंगळवारी सोडल्या होत्या.

- सुरेश लोखंडे 

ठाणे: विद्युत पुरवठा करणारी मुख्य वीज वाहक तारेचा शाँक लागून बल्याणी ता. कल्याण येथील अनिता मांजे, या आदिवासी महिलेच्या चार शेळ्या जागीच ठार झाल्या. या घटनेचा पंचनामा टिटवाला पोलिसांनी केला असून या शेळ्यांचे शवविच्छेदन ही करण्यात आले आहे. या पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

महावितरणच्या कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे बल्याणी येथील कातकरी समाजाचे अनिता बबन मांजे यांच्या २५ शेळ्यांपैकी चार शेळ्या विजेचा धक्का लागून जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी घडली आहे. या शेळ्या गावाशेजारील जंगलात चारण्यासाठी मंगळवारी सोडल्या होत्या. या शेळ्यांवर लक्ष ठेवायला अनिता यांच्या बहिणीचा मुलगा सिताराम वाघे हा होता. दरम्यान या शेळ्या ऐका मागे एक जात आसतांना निकृष्ठ दर्जेच्या निकामी झालेल्या विजेच्या पोलवरील तुटलेल्या विद्युत वाहक तारच्या विजेचा शाँक लागून या चार शेळ्या जागीच तडफडून मेल्या. संतत धार सुरु असलेल्या पावसा दरम्यान घडलेल्या या दुर्देवी घटनेतून सुदैवाने या शेळ्या चारणारा सीताराम बचावला आहे.    

विजेच्या तारेला चिकटलेल्या या तडफडणार्या शेळ्या काढण्या चा प्रयत्न करणारा सीतारामही लांब फेकला गेला आणि सुदैवाने तो बचावला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या खरीब आदिवासी महिलेच्या शेळ्या मेल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या वीज पुरवठा दुर्घटनेतील अक्षम्य निष्काळजी दुर्लक्ष करणार्‍या संबधित महावितरणच्या आधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस राजेश चन्ने, विष्णू वाघे  यांनी लावून धरली आहे. दरम्यान या जागीच ठार झालेल्या शेळ्यांचा पोलीस पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पशू वैद्यकीय आधिकारी डॉ. धनंजय मदाळे यांनी जागेवर येऊन शेळ्यांचे पोस्टमार्टम केले, या पोस्टमार्टमचा अहवालाची प्रतिक्षा करण्यात येत आहे. त्यानंतर या मेलेल्या शेळ्यांच्या नुकसान भरपाईसाठी महावितरणच्या कार्यालयाकडे पाठपुरावा करावा लागणार असल्याचे राजेश चन्ने यांनी लोकमतला सांगितले.  

कल्याण तालुक्यातील बल्याणी - मोहिली दरम्यानच्या जंगलात मंगळवारी जोरदार पावसा दरम्यान पोजेच्या पोलवरील तार तुटली. वीज प्रवाह असलेल्या या तारे च्या वाजेचा धक्का लागून सहा वर्षांच्या दोन शेळ्या व सुमारे एक ते दीड वर्षाचे दोन बच्चे मेले. त्यांचे शवविच्छेदन केले असून अहवाल यायचा बाकी आहे. - डाँ. धनंजय मदाळे, पशुवैद्यकीय अधिकारी, कल्याण पंचायत समिती.

टॅग्स :Deathमृत्यूthaneठाणे