शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चार अनुभवविश्वांचा हटके मिलाफ ‘चार सख्य चोवीस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 02:00 IST

प्रत्येकीचं क्षेत्रं वेगळं, अनुभवविश्व त्याहून वेगळं, पण तरीही जबरदस्त निरीक्षणशक्ती, हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची जिद्द, या समान धाग्याने त्या चौघी बांधल्या गेल्या त्या एका आगळ्यावेगळ्या निर्मितीसाठी.

- स्नेहा पावसकरठाणे : प्रत्येकीचं क्षेत्रं वेगळं, अनुभवविश्व त्याहून वेगळं, पण तरीही जबरदस्त निरीक्षणशक्ती, हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची जिद्द, या समान धाग्याने त्या चौघी बांधल्या गेल्या त्या एका आगळ्यावेगळ्या निर्मितीसाठी. या चौघींच्या लेखणीतून साकारला गेला तो ‘चार सख्य चोवीस’ हा लघुकथासंग्रह.अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी, पेशाने व्हॉइस थेरपिस्ट व स्तंभलेखिका डॉ. सोनाली लोहार, सूत्रसंचालन, सामाजिक कार्यातही सहभागी होणाऱ्या हर्षदा बोरकर व मराठीच्या प्राध्यापिका निर्मोही फडके यांनी नव्याने कथा लिहिल्या.आम्ही चौघी सुखवस्तू व शहरी भागातल्या. पण आम्ही काही पाहतो, अनुभवतो आणि तेच सांगण्याचा प्रयत्न या कथांमधून केल्याचे संपदा जोगळेकर-कुळकर्णी सांगतात.संग्रहात वेगवेगळ्या जाणिवा वाचकांना अनुभवता येतील, असं डॉ. सोनाली लोहार सांगतात. काही प्रसंगांना, काही भेटलेल्या व्यक्तींना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, असे हर्षदा बोरकर म्हणतात. मला उलगडलेले मराठी भाषेचे वैशिष्ट्य अधिक स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केल्याचे निर्मोही फडके म्हणाल्या.२० कथांचा समावेशसंग्रहात चारही जणींच्या प्रत्येकी पाच याप्रमाणे २० कथा आहेत. हा कथासंग्रह ‘ग्रंथाली’ प्रकाशित करत असून मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अतुल जोशी यांनी केले आहे. प्रस्तावना ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची आहे. कथासंग्रहातील रेखाचित्रे पूजा रायबागी यांनी रेखाटलेली आहेत.असा झाला प्रवासठाणे आर्ट गिल्ड अर्थात ‘टॅग’ या संस्थेने काही वर्षांपूर्वी ग्रंथगंध नावाचा साहित्यविषयक विभाग सुरू केला. डॉ. सोनाली लोहार त्याच्या प्रमुख आहेत. या उपक्र मात जोगळेकर यांनी दिलेल्या चित्राला अनुसरून २० शब्दांची कथा मागवली होती. त्यात लिहिल्या गेलेल्या कथांमध्ये सुमारे ८० टक्के कथा महिलांच्या व २० टक्के कथा पुरुषांच्या असायच्या. ग्रंथगंधची हीच संकल्पना डोक्यात ठेवून आणि समाजभान जपत याच उपक्र मात लिहिणारे काही समकालीन हात संपदा यांनी पकडले आणि त्यांची वाटचाल सुरू झाली, ती ‘चार सख्य चोवीस’च्या दिशेने.

टॅग्स :thaneठाणे