शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 06:37 IST

मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी दुपारी २ वा.च्या सुमारास वहूर गावच्या हद्दीत दोन वाहनांना ट्रकने मागून जोराची धडक दिली, तर एक वाहन या ट्रकच्या मागच्या बाजूस आपटले. अशी चार वाहनांमध्ये धडक बसली.

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी दुपारी २ वा.च्या सुमारास वहूर गावच्या हद्दीत दोन वाहनांना ट्रकने मागून जोराची धडक दिली, तर एक वाहन या ट्रकच्या मागच्या बाजूस आपटले. अशी चार वाहनांमध्ये धडक बसली. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रक सोडून तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वहूर गावच्या हद्दीत एका मोटारसायकलस्वाराला वाचवणासाठी ट्रक थांबला. या ट्रकच्या मागून मुंबई दिशेला जाणारी एमएच ४६ एयू ०४२२ कार व त्याच्या मागे एमएच ०३ बीजे १०८८ स्विफ्ट कार थांबल्या. याच दिशेने महाड औद्योगिक वसाहतीतून मुंबईला जाणारा ट्रक क्र. एमएच ४६ एफ ३७६९ हा भरधाव वेगाने येवून पुढे थांबलेल्या स्विफ्ट कारवर मागून आदळला. या धडकेमुळे स्विफ्ट कार व त्यापुढे असलेल्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. त्या वेळी तीन गाड्या उभ्या असताना याच दिशेने जाणारी महाड ते माणगाव मॅक्झीमो क्र.एमए ०६ बीएम ५७३३ हिने ट्रकला मागून जोराची धडक दिली. या चार वाहनांच्या अपघातात ट्रकचे कोणत्याही त-हेचे नुकसान झाले नाही. या अपघातानंतर पुढे मोटारसायकलस्वाराला वाचवण्यासाठी थांबलेले ट्रक, तसेच मोटारसायकलस्वार त्या ठिकाणाहून पसार झाले. अपघातानंतर काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र, वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताच्या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस, तसेच महाड शहर पोलीस ताबडतोब पोहोचले.

टॅग्स :Accidentअपघात