शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

निवडणुकीसाठी चौथ्या दिवसांपर्यंत ठाणेसाठी चार तर कल्याणला नऊ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 20:18 IST

ठाणे मतदार संघात तीन उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. आतापर्यंत या मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज आले आहेत. याप्रमाणेच कल्याण लोकसभा मतदार संघासाठी देखील आज सात अर्ज आले असून आतापर्यंत या मतदार संघात नऊ उमेदवारी अर्ज आले.ठाणे व कल्याण मतदार संघाप्रमाणे मात्र भिवंडी मतदार संघात आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या मतदार संघात आजपर्यंत एकच अर्ज आलेला आहे.

ठळक मुद्दे भिवंडी मतदार संघात आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. चर्चेतील वंचित बहुजन आघाडीतर्फे कोपरखैरणे येथील उमेदवारसोमवारी गौरी तृतिया आणि मंगळवार या शेवटच्या दिवशी विनायक चतुर्थी आणि अंगारक योग

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ठाणे मतदार संघात तीन उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. आतापर्यंत या मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज आले आहेत. याप्रमाणेच कल्याण लोकसभा मतदार संघासाठी देखील आज सात अर्ज आले असून आतापर्यंत या मतदार संघात नऊ उमेदवारी अर्ज आले आहेत.ठाणे व कल्याण मतदार संघाप्रमाणे मात्र भिवंडी मतदार संघात आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या मतदार संघात आजपर्यंत एकच अर्ज आलेला आहे. चर्चेतील वंचित बहुजन आघाडीतर्फे कोपरखैरणे येथील मल्लिकार्जुन पुजारी यांनी ठाणे मतदार संघातून आज उमेदवारी दाखल केली. त्यांचे चौथी उत्तीर्ण शिक्षण झाले आहे. याप्रमाणेच सुधारक शिंदे, माधवीलता मौर्य या अपक्ष उमेदवारांनी देखील आज ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केली आहे. याप्रमाणेच कल्याण मतदारसंघातून बहुजन महापार्टीतर्फे मोहम्मद खान,तर इंडियन युनियन मुस्लिम लीगतर्फे मुनिर अन्सारी यांनी उमेदवारी दाखल केली. याप्रमाणेच या मतदारसंघातू सुरेशकुमार पाल, अजयशाम मौर्या, देवेंद्र सिंग, शिवा अय्यर आणि दिनकर पालके या अपक्ष उमेदवारांनी आज उमेदवारी दाखल केली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक आठवडा मुदत देण्यात आली आहे. यातील आजचा चौथ दिवसही संपला आहे. उर्वरित चार दिवस शिल्लक आहेत. यातील शनिवारी व रविवार हे दोन दिवस सुटीचे वगळता आता उर्वरित दोन दिवसांच्या उमेदवारी अर्ज मोठ्याप्रमाणात दाखल होण्याची शक्यता आहे. या कालावधीत जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात प्रमुख पक्षांचे उमेदवार उमेदवारी दाखल करणार आहेत. सोमवारी गौरी तृतिया आणि मंगळवार या शेवटच्या दिवशी विनायक चतुर्थी आणि अंगारक योग आहे. या दोन दिवसांच्या शुभ मुहूर्तावर प्रमुख पक्षांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक