शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ठाण्यात तलवारीने खूनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 21:49 IST

रामनगर येथील रहिवाशी जोयेब शब्बीर सय्यद (३२) याच्यावर तलवारीने खूनी हल्ला करणाºया आकाश भालेराव (२६), आकाश शेलार (२८), सूरज हजारे (२४)आणि विवेक शर्मा (२४) या चौघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाईतलवार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रामनगर येथील रहिवाशी जोयेब शब्बीर सय्यद (३२) याच्यावर तलवारीने खूनी हल्ला करणाºया आकाश भालेराव (२६), आकाश शेलार (२८), सूरज हजारे (२४)आणि विवेक शर्मा (२४) या चौघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून खूनी हल्ल्यासाठी वापरलेली तलवारही जप्त करण्यात आली आहे.वागळे इस्टेट भागात राहणाºया जोयेब याच्यावर १३ जून रोजी रात्री १०.३० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला होता. जोयेब हा वागळे इस्टेट, कोंडवाडा रोड याठिकाणी त्याचा मित्र जावेद शेख याच्यासमवेत गप्पा मारीत उभा होता. त्याचवेळी आकाश भालेराव उर्फ वाडी आणि सूर्या हजारे हे दोघे तिथे आले. त्यांनी जोयेब याच्याकडे पहात मुन्नाभाई खान आणि शिवा ठाकूर यांना शिवीगाळ केली. त्यावेळी जोयेबने त्यांना शिवीगाळ करु नकोस, असे बजावले. यातूनच त्यांच्यात बाचाबाची झाल्याने त्यांनी जोयेबला मारहाण केली. त्यानंतर त्याने त्याच्या इतर दोन मित्रांनाही तिथे बोलावून घेतले. तिथे आलेल्या त्याच्या मित्रांनी आणलेल्या तलवारीने भालेराव याने जोयेबच्या कान आणि डोक्यावर वार केले. तर इतरांनी लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर या टोळक्याने तिथून पलायन केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि पोलीस निरीक्षक एम. व्ही. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. बी. जाधव यांच्या पथकाने भालेराव, शेलार आणि हजारे या तिघांना १४ जून रोजी अटक केली. या तिघांनाही १९ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. तर विवेक शर्मा याला बुधवारी (१६ जून रोजी) अटक केली आहे. त्याला २३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी