शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत साडे चार फूट घोरपड अग्निशमन दलाच्या जवानांनी पकडली; 5 दिवसांनंतर नागरिकांची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 16:45 IST

Bhiwandi News : मागील पाच दिवसांपूर्वी ही घोरपड महापालिकेच्या सार्वजनिक गटारात नागरिकांना आढळून आली होती

नितिन पंडीत

भिवंडी - शुक्रवारी गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सकाळी साडे अकराच्या सुमारास शहरातील संत नामदेव मंदिर शेजारी असलेल्या दर्पण बुक डेपो या दुकानाच्या गल्लीत गटारा मार्गे शिरलेल्या एका साडे चार फूट लांबीची घोरपड अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने पकडून तालुक्यातील वडपा येथील जंगलांमध्ये सुरक्षितरित्या सोडले आहे. 

मागील पाच दिवसांपूर्वी ही घोरपड महापालिकेच्या सार्वजनिक गटारात नागरिकांना आढळून आली होती. त्यामुळे स्थानिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दल व ठाण्यातील एका प्राणी मित्राच्या संघटनेला पकडण्यासाठी पाचारण केले होते. मात्र ही घोरपड लांबीने मोठी व चपळ असल्याने ती पकडण्यास अपयश येत होते. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अर्धवट सोडून सर्वजण निघून गेले होते. त्यामुळे घोरपड तशीच गटारात असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. 

शुक्रवारी सकाळी ही घोरपड गटारातून बाहेर आली आणि दुकानाच्या गल्लीमध्ये बसून होती हे पाहताच दुकानदारांनी अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती दिली . त्यांनतर पुन्हा जवानांनी घटनास्थळी धाव घेऊ चकमा देऊन पळालेल्या घोरपडीस मोठ्या शिताफीने पकडून कापडाच्या गोणीमध्ये बंद केले.  यावेळी या घोरपडी ने आपले शरीर फुगवून जोरात शेपटीचा मारा जवानांवर केला मात्र त्यांनी तो चुकवत यशस्वीरित्या या घोरपडीस पकडून तिला सुरक्षितपणे भिवंडी - नाशिक महामार्गावरील वडपा गाव जंगलात सोडण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान राजू कासारे, बापू गुरव, आसाराम आघाव, देविदास वाघ, हरिश्चंद्र साबरे या जवानांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीFire Brigadeअग्निशमन दल