शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 14:34 IST

जोशी - बेडेकर महाविद्यालयातर्फे होणार ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती .

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला - वाणिज्य  महाविद्यालयाच्या वतीने शनिवार  दिनांक १६  जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता ऑनलाईन 'वित्त लेखा कर व अंकेक्षणातील नवे विचार प्रवाह' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाचे  उपाध्यक्ष सीए निहार जम्बुसारीया व वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिलचे अध्यक्ष सीए ललित बजाज  उपस्थित राहणार आहेत.यावेळी आशिया ओशनिक अकाउंटिंग स्टैंडर्ड बोर्ड या संस्थेचे प्रमुख सीए शिवाजी झावरे यांचे बीजभाषण  होणार आहे. 

       परिषदेमध्ये "वित्त व अंकेक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती" या विषयावर गोदरेज एग्रोवेट चे प्रमुख वित्त अधिकारी सीए वरदराज सुब्रमण्यम व सीए मंगेश किन्नरे यांचे भाषण होणार आहे;  तसेच "शेअर क्षेत्राचे तांत्रिक आकलन" या विषयावर सीए रचना रानडे व सीए कमलेश साबू यांचे व्याख्यान होणार आहे. परिषदेच्या तिसऱ्या सत्रात श्री मुकेश इसरानी व प्रा अपर्णा धर्माधिकारी यांचे भाषण होणार आहे. 

           परिषदेत "लेखा व अंकेक्षण क्षेत्रातील नवे विचार प्रवाह" या विषयावर तज्ञ अभ्यासकांचा परिसंवाद होणार असून त्यामध्ये मेकेसन युरोपचे सीए केदार जगताप, वर्ल्ड बँकेचे सीए अशिष बेके, टारगेट कॉर्पोरेशनचे श्री आशिष शेट्टी, नयारा एनेर्जी लिमिटेडचे श्रीनिवासन पार्थसारथी,   इनग्राम मायक्रो इंडिया लिमिटेड प्रमुख वित्त अधिकारी सीए प्रभाकर अय्यर यांचा सहभाग आहे. वेस्टन इंडिया रिजनल कौन्सिल चे सचिव मुर्तजा काचवालाया सत्राचे अध्यक्ष आहेत.            या परिषदेमध्ये तज्ञ अभ्यासक संशोधक व विद्यार्थी यांचे शोधनिबंध देखील  सादर होणार आहेत. परिषदेचा समारोप सत्रात भुटानचे रजनीश रत्ना यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन ठाकूरदेसाई यांचे सहाय्य प्राप्त झाले आहे.            वित्त, लेखा व कर आकारणी मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ब्लॉक चेन , सायबर सिक्युरिटी, डेटा अनलिटिक्स इत्यादी नवीन तंत्रज्ञानाचा सध्या उपयोग होत आहे .नवीन उद्योगधंद्यांच्या स्थापनेपासून कार्य विस्तारामध्ये वित्त लेखा व कर आकारणी क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर ऑटोमेशन व समाज माध्यमांचा वाढता वापर इत्यादी नवीन तंत्रज्ञानाचा जोमाने वापर होत आहे. कोरोनोत्तर काळामध्ये होणाऱ्या या नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक , विद्यार्थी व सुबुद्ध नागरिक या सर्वांनी  एकत्र येऊन विचार मंथन करण्यासाठी या  परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत महाविद्यालयाच्या लेखा विभागाचे प्रमुख सीए योगेश प्रसादे यांनी व्यक्त केले. 

          या परिषदेत अर्थ विषयक चर्चा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसाधारण नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी काय करता येईल याचे चिंतन होईल असा विश्वास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी व्यक्त केला.                    विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत व आंतरराष्ट्रीय परिषदेत अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभू