शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

लूकआऊट नोटीसमुळे माजी आमदार मेहतांना परदेशात जाण्यापासून खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 01:03 IST

भाजपच्या एका नगरसेविकेने केलेल्या लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये लूकआऊट नोटीस असल्यामुळे मीरा भार्इंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना बुधवारी इमिग्रेशन विभागाने मालदीवला जाण्यापासून रोखले. त्यानंतर ठाणे पोलिसांनीही त्यांची चौकशी केली.

ठळक मुद्दे इमिग्रेशन विभागाने घेतले ताब्यातठाणे पोलिसांनी केली चौकशी

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भाजपच्या एका नगरसेविकेने केलेल्या लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये लूकआऊट नोटीस असल्यामुळे मीरा भार्इंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना बुधवारी इमिग्रेशन विभागाने मालदीवला जाण्यापासून रोखले. त्यानंतर ठाणे पोलिसांनीही त्यांची चौकशी केली. त्यामुळेच फिरायला जाण्याच्या मूडमध्ये असलेल्या मेहतांची पंचाईत झाली.मेहता यांच्याविरु द्ध त्यांच्या एकेकाळच्या मैत्रिणीने सुमारे दीड वर्षापूर्वी मीरा रोड पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलिसांकडे होता. मीरा भार्इंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर हे प्रकरण ठाणे शहर पोलिसांकडे गृह विभागाने वर्ग केले. याच गुन्ह्यात मेहता यांच्याविरु द्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली होती. मेहता हे कुटुंबीयांसह 25 आॅगस्ट 2021 रोजी दुपारी मालदीवला जाण्याच्या बेतात होते. त्यांनी परतीच्या फ्लाईटचेही तिकीट आरिक्षत केले होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी आधीच काढलेल्या लूकआऊट नोटीसमुळे इमिग्रेशन विभागाने त्यांना विमानतळावरच रोखले. त्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाला देण्यात आली. त्याच आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी त्यांची विमानतळावरच चौकशी केली. या चौकशीमध्ये फिरायला जाण्यासाठी परदेशी (मालदीवला) जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, चौकशीला संपूर्णपणे पोलिसांना सहकार्य करणार असल्याची हमीही त्यांनी दिली. शिवाय, याच गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला असल्याने अटक न करण्याचेही न्यायालयाचे निर्देश असल्याची कागदपत्रेही पडताळण्यात आली....तर त्यांना रोखले नसतेअर्थात, पोलिसांना यासंदर्भातील माहिती मेहतांनी आधीच दिली असती तर त्यांना कदाचित रोखण्यात आले नसते. आता 25 ऐवजी 26 आॅगस्टला ते पुन्हा मालदीवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याविरु द्धच्या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी