शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक वैभव कदम यांची रेल्वेखाली आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: March 29, 2023 15:21 IST

ठाणे रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरु

ठाणे : माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा दरम्यान उपनगरी रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९.०५ वाजताच्या सुमारास घडली. अभियंता अनंत करमुसे प्रकरणी ठाणे पोलिसांकडून त्यांची गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरु होती. आता या आत्महत्या प्रकरणाचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचेनेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, मुबंई पोलिसांच्या विशेष सुरक्षा दलात (एसपीयू) मध्ये नेमणूकीला असलेल्या कदम यांचा आव्हाड यांच्या ठाण्यातील "नाद' बंगल्यावर करमुसे यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून समावेश होता. यात अटक झाल्यानंतर त्यांची जामीनावर सुटकाही झाली होती. त्यांची याच प्रकरणात गेल्या काही दिवसापासून ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरु होती. त्यामुळेही ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते.

बुधवारी सकाळी दिवा ते रोहा अशी जाणाऱ्या मेमो उपनगरी खाली निळजे ते तळोजा दरम्यान त्यांनी स्वतःला झोकून दिले. घटनास्थळी त्यांचे शीर आणि हात धडावेगळे झाले. त्यांना तातडीने तशाच अवस्थेत दिवा येथील बालाजी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याकडे मोबाईल आणि काही पैसे मिळाल्याचे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.आरोपी नसल्याचे मोबाईलवर ठेवले स्टेट्स वैभव यांनी मृत्यू पूर्वी आपल्या मोबालवर एक स्टेट्स ठेवले आहे. पोलीस आणि मीडियाला विनंती आहे की, यात आपण आरोपी नाही, असा मजकूर यामध्ये आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे