शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

५० खोक्यांची घोषणा काश्मीरपर्यंत गेली; ठाण्यात लवकरच मोठी सभा घेणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

By अजित मांडके | Updated: January 26, 2023 14:43 IST

ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर पार पडत आहे. या शिबिराचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाणे- अस्सल निष्ठावंत येथे आहेत. बाकीचे काय भावाने विकले हे तुम्हाला माहित आहे. ५० खोक्यांची घोषणा काश्मिरपर्यंत गेल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तर ठाण्यात लवकरच सभा घेतली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांची २७ जानेवारी रोजी जयंती आहे. यानिमित्ताने आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर पार पडत आहे. या शिबिराचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यातील बहुतांश नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षाला सर्वाधिक फटका ठाण्यात बसला आहे. याच ठाण्यात ठाकरे गटाने आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबीरास उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळेस ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी जागतिक संकट आले होते.

सर्व धर्मियांनी सहकार्य केले. मंदिर बंद होते तेव्हा डाॅक्टर, पोलीस, नर्स यांसारखे सर्व देव म्हणून आले होते. राजकारणाच्या घाणीत न जाता तुम्ही निष्ठेने काम करता. याला शिवसैनिक म्हणतात. असेही ते म्हणाले. अस्सल निष्ठावंत येथे आहेत. बाकीचे काय भावाने विकले हे तुम्हाला माहित आहे. ५० खोके घोषणा काश्मिरपर्यंत पोहचल्याची टिकाही त्यांनी शिंदे गटावर केली. तसेच काही दिवसांत ठाण्यात प्रचंड सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthaneठाणे