शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात शाई धरणाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 05:20 IST

ठाणेकर तहानलेलेच : लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाची अनास्था

ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात ३० टक्के पाणीटंचाई असताना आणि नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरातील अनेक गृहसंकुलांनी पाणीटँकरचा आधार घेतलेला असतानाही यंदाच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या ऊहापोहाशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रस्तावित शाई धरणाविषयी काहीच उल्लेख नाही. यामुळे महापालिकेने शाई धरणाच्या कामातून काढता पाय घेतला की काय, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

भविष्यातील ठाणेकरांची तहान भागावी, या उद्देशाने महापालिकेने मोठ्या प्रयत्नानंतर शाई धरणाचा प्रकल्प खेचून आणला होता. किंबहुना, त्याला मंजुरी मिळवून २००७ मध्ये जलसंपदा विभागाला शाई धरणासाठीचे सर्वेक्षण आणि खर्चाचा आराखडा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, याचा सर्व्हेदेखील पूर्ण झाला असून ४५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला. परंतु, लोकप्रतिनिधींनी अनास्था दाखवून हे धरण उभारण्याची क्षमता नसल्याचे कारण पुढे करून त्याचे काम एमएमआरडीएने करावे, असे सूचित करून त्यातून मिळणारे पाणी ठाण्याबरोबरच इतर महापालिकांना द्यावे, असे सुचवले. यामुळे तीव्र पाणीटंचाईला तोंडद्यावे लागत असल्याने ठाणेकर त्रस्त झाले आहेत.खर्च १४०० कोटींवर : ठाणेकरांना हक्काचे धरण मिळाले असते, तर २०४६ पर्यंतची तहान ठाणेकरांची यामुळे भागू शकली असती. दरम्यान, या धरणाचा खर्च ४५० कोटींवरून १४०० कोटींच्या आसपास गेला आहे, त्यामुळे आता तो पालिकेच्या डोक्यावरून जाणार आहे. विशेष म्हणजे हे धरण झाले असते, तर इतर स्रोतांकडून पाण्यासाठी केला जाणारा खर्च हा ५० टक्कयांवर आला असता आणि ठाणेकरांना त्याच पैशांतून हक्काचे धरणही मिळाले असते. परंतु, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या अनास्थेने यंदाच्या अर्थसंकल्पात त्याचा विसर पडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका