शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील महिलेवर विदेशी नागरिकाचा अत्याचार, लाखोंची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 20:49 IST

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून पवई (मुंबई) येथील एका ४२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-या वेन स्मिथ (५२, रा. सॅलफोर्ड, मॅन्चेस्टर, यू. के.) या परदेशी नागरिकांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून पवई (मुंबई) येथील एका ४२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-या वेन स्मिथ (५२, रा. सॅलफोर्ड, मॅन्चेस्टर, यू. के.) या परदेशी नागरिकांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आधी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर तिने न्यायालयात खासगी तक्रार दिली. त्याच आधारे न्यायालयाने हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले.तिच्यासोबत आॅगस्ट २०१५ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत लग्नाचे अमिष दाखवून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटमधील एका इमारतीमध्ये आणि नेपाळ तसेच मँचेस्टर (इंग्लंड) आदी भागात वारंवार लैंगिक अत्याचार करून आर्थिक अडचण असल्याचे कारण दाखवून तिच्याकडून दोन लाख रुपये उकळले. त्यानंतर नेपाळ येथे फिरायला जाण्याच्या निमित्ताने त्याने तिच्याकडून एक लाख रुपये घेतले. या प्रकारानंतर वेन हा आपल्या मायदेशात परतला. वारंवार संपर्क करूनही त्याने दाद न दिल्याने पीडित महिलेने आधी कासारवडवली पोलीस ठाण्यात नंतर न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानंतर कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा अखेर दाखल केला आहे.........................अशी झाली ओळख....या महिलेची वेन स्मिथ या परदेशी नागरिकाबरोबर नाशिकच्या एका मठात ओळख झाली. तिथेच त्यांच्या गाठीभेटी झाल्या. ओळखीचे मैत्रित रुपांतर झाल्यानंतर नेपाळ आणि लंडनलाही ते एकमेकांसोबत गेले. मात्र, लग्न करण्याच्या नावाखाली त्याने तिची लैंगिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :thaneठाणे