शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:33 AM

मनसेचा आरोप : ...अन्यथा दुकान सील करण्याची ठाणे महापालिकेची जबरदस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट न केल्यास तुमची दुकाने सील करू, असे ठाणे महापालिकेने धमकावल्याचा आरोप चंदनवाडी परिसरातील दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. मनसेने बुधवारी हा मुद्दा उपस्थित करून, खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्याची महापालिकेकडून जाणारी जबरदस्ती म्हणजे ठाणेकरांची गळचेपी असल्याचा आरोपही केला आहे. मात्र, महापालिकेकडून अशी कोणतीही जबरदस्ती नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या दुकानदारांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोविड टेस्ट करण्याची पत्रके वाटली. यात एका खाजगी लॅबचा उल्लेखदेखील केला आहे. कोविड टेस्ट केली नाही तर दुकाने सील करु, असे पालिकेच्या कर्मचाºयांकडून सांगण्यात आले. याबाबत या दुकानदारांनी मनसेचे कोपरी पाचपाखडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांच्याकडे धाव घेतली.यावेळी त्यांनी सरकारी रुग्णालयांत या दुकानदारांची कोविड टेस्ट का होऊ शकत नाही, असा प्रश्न केला. खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी दोन हजार ८00 रुपये लागतील, असे महापालिकेच्या कर्मचाºयांनी या दुकानदारांना सांगितले.त्यावर ठाणेकरांसाठी एक लाख अण्टीजन टेस्ट आल्या असताना खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट करण्याचा महापालिकेचा अट्टाहास का? महापालिकेचा यामागे मोठा भ्रष्टाचार असून, तो उघड करण्याचा इशारा कदम यांनी दिला.महापालिकेचे कर्मचारी पत्रक घेऊन आले त्यावेळी त्यांनी आम्हाला खाजगी लॅबचा संदर्भ देत त्याठिकाणी दोन हजार ८00 रुपये देऊन कोविड टेस्ट करण्याचे सांगितले. आम्ही इतकी महागडी टेस्ट करणार नाही, असे दुकानदारांनी म्हटल्यावर कोविड टेस्ट न केल्यास दुकाने सील करण्याची धमकी कर्मचारी दिल्याची माहिती दुकानदार नजीब शेख यांनी दिली.दरम्यान, महापालिकेने टेस्ट करण्याचे आवाहन केले तर ती चाचणी मोफत करावी, अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील सर्व दुकानदारांना कोविड टेस्ट करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. ते ज्या प्रभाग समितीअंतर्गत येतात, त्याच ठिकाणच्या जवळच्या लॅबचा त्यांना संदर्भ दिला जातो. पण, त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. ते कुठेही टेस्ट करू शकतात. दुकाने सील केले जाईल, असे पालिकेने सांगितलेले नाही.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या