शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील शिरोळे आश्रम शाळेतील १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 22:40 IST

 यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

नितिन पंडीत 

भिवंडी -  भिवंडी तालुक्यातील शिरोळे येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. उर्वरित सोळा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

 भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या शिरोळे गावातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील पाच विद्यार्थ्यांना २८ मार्च रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी कळवा येथील शासकीय रुग्णालयात या विद्यार्थ्यांना हलवण्यात आले होते. दरम्यान २९ मार्च रोजी ज्योत्स्ना जयवंत सांबर या नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर ३० मार्च ३१ मार्च एक एप्रिल व दोन एप्रिल या सहा दिवसात तब्बल १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे आढळल्याने या विद्यार्थ्यांवर कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या घटनेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरली असून २८ मार्च रोजी काही विद्यार्थ्यांनी जेवणानंतर काकडी व त्यानंतर प्लास्टिक पिशवीत मिळणारी बर्फाची पेप्सी खाल्ल्यानंतर ५ विद्यार्थ्यांना उलटी व जुलाब व इतर लक्षणे जाणवू लागली होती. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र त्यानंतर त्यांना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांपैकी ज्योत्स्ना सांबर या नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्या नंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून या घटनेनंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या बालरोग तज्ञांची टीम आश्रम शाळेत दाखल होत त्यांनी सदर घटनेची माहिती घेतली असून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी व उपचार केले त्याचबरोबर शहापूर येथील प्रयोगशाळेत येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते मात्र सदरचे पाणी पिण्या योग्य असल्याचे प्रयोगशाळेतील अहवालात स्पष्ट झाले आहे त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्रम शाळेत धाव घेत विद्यार्थ्यांनी खाल्लेली पेप्सी व अन्नधान्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती भिवंडी तालुका आरोग्य अधिकारी माधव वाघमारे यांनी दिली आहे. या घटनेची नोंद पडघा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.