शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापाठोपाठ आता ठाण्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट, त्या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्युमुळेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 17:27 IST

bird flu in Thane : मागील आठवडय़ात घोडबंदर भागात दोन ठिकाणी १६ पक्षी मृत अवस्थेत आढळले होते. त्यानंतर आता यातील ४ पक्ष्यांचा अहवाल आला असून त्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाणे  - कोरोनाचे संकट आजही ठाण्यावर कायम असतांना आता ठाण्यावर बर्ड फ्युलचे संटक कोसळले आहे. मागील आठवडय़ात घोडबंदर भागात दोन ठिकाणी १६ पक्षी मृत अवस्थेत आढळले होते. त्यानंतर आता यातील ४ पक्ष्यांचा अहवाल आला असून त्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाण्यावर आता बर्ड फ्लुचे संकट उभे ठाकले आहे. यासाठी पालिकेने आता सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे. घोडबंदर पट्ट्यातील कावेसर या भागात विजय गार्डन आणि कोकणी पाडा येथील  हिल गार्डन या परिसरात मागील आठवडय़ात बुधवारी सकाळी १६ पक्षी हे मृत अवस्थेत आढळल होते. त्यातील आठ पक्षी हे कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे उर्वरीत 8 पक्ष्यांचे अवशेष सुरक्षेचा उपाय म्हणून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये पोपट आणि पानबंगळ्याचा समावेश होता. त्यानंतर आता यातील ४ पक्ष्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. उर्वरीत चार पक्ष्यांचा अहवाल येणो बाकी आहे. परंतु ज्या पक्ष्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्यूमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये तीन पानबगळे आणि एका पोपटचा समावेश आहे.दरम्यान बर्ड फ्ल्यू च्या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यात हाय अलर्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्रा मात्न या रोगाचा धोका नसल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. परंतु आता ठाण्यात आता बर्ड फ्ल्युने डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाण्यात ४ पक्ष्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाणोकरांना पालिकेने सावध राहण्याचा इशारा दिला असून अशा प्रकारे पक्षी मृतावस्थेत आढळल्यास पालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूthaneठाणे