शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फुले नाट्यगृह १ जुलैला सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:56 IST

सावित्रीबाई फुले कलामंदिरात सुरू असलेले वातानुकूलित यंत्रणा बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केडीएमसीने निश्चित केले आहे.

डोंबिवली : सावित्रीबाई फुले कलामंदिरात सुरू असलेले वातानुकूलित यंत्रणा बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केडीएमसीने निश्चित केले आहे. त्यानंतर, चाचणी घेऊन नाट्यगृह सुरू केले जाणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अथवा १ जुलैला नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची दाट शक्यता आहे.सप्टेंबरपासून फुले कलामंदिर वातानुकूलित यंत्रणेच्या कामासाठी बंद ठेवण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात कामाला जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली. मेच्या शेवटच्या आठवड्यात नाट्यगृह सुरू होईल, असा दावा केला जात होता. परंतु, यठिकाणी असलेल्या बेसमेंटमध्ये कल्याण लोकसभा निवडणुकीतील मतदानयंत्रे चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली होती. २३ मे या निवडणूक निकालाच्या दिवसापर्यंत ही मतदानयंत्रे त्याठिकाणी होती. नाट्यगृहाचे बेसमेंट हे नाट्यगृहाच्या मागील बाजूस असल्याने तेथील बंदोबस्ताचा फटका नाट्यगृहात सुरू असलेल्या कामाला बसणार नाही, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात मतमोजणीच्या आधी सुरक्षेच्या कारणास्तव ८ ते १० दिवस त्याठिकाणी कोणालाही फिरकू दिले नाही. पालिका अधिकाऱ्यांनाही नाट्यगृहात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे त्या कालावधीत काम होऊ शकले नाही, अन्यथा जूनच्या पहिल्या आठवड्यातच वातानुकूलित यंत्रणेची चाचणी घेऊन नाट्यगृह सुरू करता आले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली.>अर्ज स्वीकारण्यास सुरुवातवातानुकूलित यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात आल्याने साधारण जुलै महिन्यापासून नाट्यगृह सुरू होईल, असा अंदाज व्यवस्थापनाकडून बांधण्यात आला आहे. यासाठी जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत दिल्या जाणाºया प्रयोगाच्या तारखांचे अर्ज स्वीकारण्यास व्यवस्थापनाने सुरुवात केली आहे.>वातानुकूलित यंत्रणेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सद्य:स्थितीला युद्धपातळीवर काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेतली जाईल, याला साधारण १५ जूनपर्यंत कालावधी लागेल. त्यानंतरच नाट्यगृह सुरू होईल. - प्रशांत भागवत, उपअभियंता, विद्युत विभाग केडीएमसी