शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या आणि पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:53 IST

भटक्या कुत्र्यांसह पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेने अखेर पावले उचलली आहेत.

ठाणे : भटक्या कुत्र्यांसह पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेने अखेर पावले उचलली आहेत. त्यानुसार घोडबंदर येथील कावेसर भागात ५ हजार चौरस मीटर जागेवर महापालिका पाळीव - भटक्या प्राण्यांकरीता उपचार केंद्र, नसबंदी केंद्र, आधारगृह, स्मशानभूमी असे एकाच छताखाली पेट पार्क विकसित करणार आहे. खाजगी संस्थेच्या माध्यमातून याची देखभाल केली जाणार असून यासाठी स्वारस्य देकार मागविले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे.यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आधीच मार्गदर्शक तत्वे घातली आहेत. त्यानुसार भटक्या प्राण्यांकरीता आधारगृह, कोंडवाडे बांधणे, भटक्या प्राण्यांची नसबंदी करणे, मृत प्राण्यांच्या दहनाकरीता स्मशानभूमीची सोय करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. याच मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत ठाणे महापालिकेने आता पावले उचलली आहेत. सध्या महापालिका हद्दीत ३ हजार चौरस फूट जागेत भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याठिकाणी २ आॅपरेशन थिएटर असून तिथे त्यांच्यावर उपचारही केले जातात. परंतु ही जागा कमी पडत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता पेट पार्क उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला आहे.या प्रस्तावानुसार प्राण्यांची नसबंदी, प्राण्यांवर उपचार, आधारगृहे - कोंडवाडा, शवदहन वाहीनी आणि पेट पार्क विकसित केले जाणार आहे. यासाठी ५ हजार चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडाची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार कावेसार येथील पार्कचे आरक्षण असलेल्या भूखंडावर हे पार्क विकसित केले जाणार आहे. याठिकाणी पार्कचे ११८००.०० चौरस मीटरचे आरक्षण असून त्यातील ५ हजार चौरस मीटर आरक्षणावर हे सुविधा केंद्र विकसित केले जाणार आहे.

टॅग्स :dogकुत्राthaneठाणे