कल्याण : उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथून आपल्या शेजाऱ्यासोबत एक तरुणी पळून आली होती. तिचा शोध घेण्यासाठी तिचा भाऊ मुंबईत आला. त्याने तिचा शोध घेऊन तो तिला परत घेऊन जात असताना ती कल्याण स्थानकातून पुन्हा गायब झाली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीच्या भावाने तक्रार दिली आहे. तरुणी उत्तर प्रदेशातून शेजारी राहणाऱ्या मोहसीन सोबत पळून आली. तिच्या शोधासाठी तिचा भाऊ हुसेन हा मुंबईतील घाटकोपर परिसरात आला होता. २० एप्रिलला त्याने घाटकोपर गाठले. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ती खंडाळा रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना दिसली. (प्रतिनिधी)
पळालेली तरुणी पुन्हा गायब
By admin | Updated: April 24, 2017 23:41 IST