शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींचे निराकरण जलदगतीने करा!, आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:58 IST

विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिका-यांना दिले.

कल्याण : विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिकाºयांना दिले. ई गव्हर्नन्स विभागाचे कामकाज सक्षम करण्याच्या दृष्टीने या विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातही सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी सूचना केल्या.महापालिकेत दर सोमवारी होणाºया साप्ताहिक आढावा बैठकीत विविध विभागाच्या कामांचा आढावा घेतला जातो. या बैठकीत वेलरासू यांनी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेने केलेल्या नियोजनाचा आढावाही घेतला. त्यात त्यांनी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडून घेतली.विसर्जनासाठी महापालिकने कल्याण व डोंबिवली येथे कृत्रीम तलाव तयार केलेले आहेत. या तलावांमध्ये दीड दिवसाच्या पाच हजार ११४ मूर्तींचे विसर्जन शनिवारी झाले. महापालिकेने गणेशोत्सवात होणारे प्रदूषण टाळण्यावर अधिक भर दिला आहे.त्यापार्श्वभूमीवर भाविकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन महापालिकेने बांधलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन वेलरासू यांनी या वेळी केले. त्यानंतर प्रभाग क्षेत्र अधिकाºयांना प्रभागा अंतर्गत स्वच्छता ठेवणे, शहरातील बॅनर-होर्डिंग काढणे, याशिवाय नागरिकांकडून प्राप्त तक्र ारींचे निराकरण जलदगतीने करण्याच्या सूचना वेलरासू यांनी दिल्या.सिस्टीम मॅनेजर आणि अ‍ॅनालिस्टपदे भरणारई गर्व्हनन्सप्रणाली राबवणारी केडीएमसी ही राज्यातील महापालिका आहे. सध्या हीच प्रणाली राज्यातील अन्य नगरपालिका, महापालिकांमध्ये राबवली जात आहे.मात्र, आतापर्यंत केडीएमसीचा कारभार कितपत पेपरलेस झाला? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. असे असताना येथील ई गर्व्हनन्स विभागाचे कामकाज अधिक सक्षम करण्याचा निर्णय वेलरासू यांनी घेतला आहे. या विभागातील सिस्टीम मॅनेजर, सिस्टीम अ‍ॅनालिस्टही प्रभारी पदे कायमस्वरूपी तातडीने भरण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.केडीएमटीचेउत्पन्न वाढवा!परिवहन विभागातील कामकाजाचा आढावा घेताना आयुक्त वेलरासू यांनी परिवहन महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना परिवहन सेवा सक्षम करण्याचे आदेश दिले. ज्यामार्गावर जास्त प्रवासी आहेत, अशा मार्गांवर जादा बस गाड्या सोडाव्यात, प्रवाशांनाजास्तीत जास्त दिलासा कसा मिळेल, याचे नियोजन करावे,अशा सूचना दिल्या. आवश्यकत्या भासल्यास नवीन बसवरचालक-वाहक यांची संख्या वाढवून, उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्यत्न करण्याचेही निर्देशही त्यांनी दिले आहेत.