शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयाचे प्लास्टर पडल्याने पाच वर्षाची मुलगी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 21:25 IST

भिवंडी : शहरात महानगरपालिकेने बांधलेल्या एमएमआरडीए शौचालयाच्या वाढत्या तक्रारी असताना पालिकेचे बांधकाम विभाग व आरोग्य-स्वच्छता विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. असे असताना गेल्या महिन्यात दुरूस्ती व सुशोभिकरणाच्या नांवाखाली घाईघाईने केलेले बांधकामाचे प्लास्टर पडून शाौचालयास गेलेली पाच वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात ठेकेदार,पालिकेचे अभियंतासह ...

ठळक मुद्दे बांधकामाचे प्लास्टर पडून शाौचालयातील पाच वर्षाची मुलगी जखमीशौचालयाची नव्याने दुरूस्ती व सुशोभीकरण केले मागील महिन्यातशौचालय परिचालक,बांधकाम ठेकेदार व मनपा अभियंत्या विरोधात गुन्हा

भिवंडी : शहरात महानगरपालिकेने बांधलेल्या एमएमआरडीए शौचालयाच्या वाढत्या तक्रारी असताना पालिकेचे बांधकाम विभाग व आरोग्य-स्वच्छता विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. असे असताना गेल्या महिन्यात दुरूस्ती व सुशोभिकरणाच्या नांवाखाली घाईघाईने केलेले बांधकामाचे प्लास्टर पडून शाौचालयास गेलेली पाच वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात ठेकेदार,पालिकेचे अभियंतासह शौचालय चालका विरोधात तक्रार केल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.शहरात शांतीनगर भागातील पिराणीपाडा येथे सलाऊद्दीन हायस्कुल समोर पालिकेने सार्वजनिक शौचालय बांधले आहे. या शौचालयांत काल गुरूवार रोजी मरीयमबानो सलीम शेख ही पाच वर्षाची मुलगी शौचास गेली होती.ती शौचालयांत असताना तीच्या डोक्यावर वरून नव्याने बांधकाम केलेले प्लास्टर पडले आणि तीच्या डोक्यास मार लागून ती जखमी झाली.या शौचालयाची नव्याने दुरूस्ती व सुशोभीकरणाचे काम गेल्या महिन्यात बांधकाम ठेकेदार रेहान अन्सारी याने केले आहे.मात्र ठेकादाराने निष्काळजीपणाने शौचालयाची दुरूस्ती व सुशोभिकरणाचे काम केल्याने महिनाभरांत हा अपघात झाला. त्याकडे पालिकेच्या विभागीय अभियंत्यांनी ढूंकूनही पाहिलेले नाही,असा आरोप परिसरांतील नागरिकांनी केला आहे.हे शौचालय परिचालन करण्यासाठी आदर्श सामाजीक सेवा संस्थेला दिले असून शौचालय परिचालक संदिप जोगू यांनी शौचालयाच्या मागील महिन्यात केलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांची जीवीत व वैयक्तीक सुरक्षा धोक्यात आली आहे. त्या मुळे मरीयमबानो हिच्या दुखापतीस कारणीभूत असणारे बांधकाम ठेकेदार रेहान अन्सारी, शौचालय परिचालक संदिप जोगू व मनपाचे बांधकाम विभागातील संबधित अभियंता यांच्या विरोधात जखमी मरियमबानोचे वडील सलीम इस्तेखार महरूम शेख यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंद केला असुन या तक्रारीने पालिकेचे अधिकारी अडचणीत आले आहेत.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात