शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या टोळीच्या तपासासाठी पाच पथके

By admin | Updated: April 22, 2017 02:36 IST

येथील नौपाडा भागातून पकडलेल्या दरोडेखोरांच्या सखोल तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पाच स्वतंत्र पथकांची निर्मिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केली आहे.

- जितेंद्र कालेकर,  ठाणेयेथील नौपाडा भागातून पकडलेल्या दरोडेखोरांच्या सखोल तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पाच स्वतंत्र पथकांची निर्मिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केली आहे. प्रत्येकी तीन दरोडेखोरांच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश या पाच पथकांना दिले आहेत. देशभरातील अनेक राज्यांमध्ये लूटमार करून धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीच्या ‘कारनाम्यां’ची व्याप्ती लक्षात घेऊन गुन्हे अन्वेषण विभागातील केवळ एका अधिकाऱ्याकडे हा तपास देण्यापेक्षा पाच वेगवेगळ्या निष्णात अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. यामध्ये गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-१ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, युनिट-२ भिवंडीच्या शीतल राऊत, युनिट-४ उल्हासनगरचे संजय साबळे, युनिट-५ वागळे इस्टेटचे मदन बल्लाळ आणि खंडणीविरोधी पथकाचे निवृत्ती कदम या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रत्येक पथकाकडून आता टोळीतील प्रत्येकी तिघांचा तपास पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सोने गहाण ठेवून कर्ज देणाऱ्या खासगी संस्थेमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या १५ दरोडेखोरांच्या टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी जेरबंद केले. ठाण्याच्या नौपाड्यातील मुथूट फायनान्स, मीरा रोड येथील अरिहंत ज्वेलर्स आणि बोईसर येथील एका सराफाच्या दुकानात दरोडा टाकून लूटमार करण्याची त्यांची योजना होती. ही एक मोठी आंतरराज्य टोळी असून त्यांनी आतापर्यंत देशातील अनेक ठिकाणी दरोडे टाकले आहेत. त्यांच्या चौकशीत असुद्दीन शेख, महमद जमीर अली, बरकत शेख, सेनाऊल शेख (रा. सर्व झारखंड) या चौघांच्या टोळीने दीड वर्षांपूर्वी अर्नाळा येथील सराफाच्या दुकानातून अडीच कोटींचे सात किलोचे सोने लुटले होते. तर, अब्दुल माजिद शेख आणि उमर रज्जाक शेख यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह मुंबईच्या काळा चौकी भागात दरोडा टाकला होता.