शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पडघ्यातील गोळीबारप्रकरणी पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 05:55 IST

१४ जण फरार : भाजपा पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

भिवंडी : तालुक्यात खारपट्ट्यातील जमीनमालकांनी विकासकांमार्फत गोदामांचा विकास केल्याने या भागात जमीनच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे विकासकांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील विविध गावांत गोदामे बांधण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा विकास सुरू असताना आपले राजकीय व आर्थिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी काही नेत्यांमध्ये अहमहमिका लागली असून त्यामधून मागील महिन्यात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेने परिसरात गँगवार सुरू होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेतून आरोपींचा छडा लावत पाच जाणांना अटक केली. तर, १४ जण फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

२० आॅक्टोबरला पडघ्याजवळच्या आन्हे गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश ऊर्फ विजू गायकर यांच्यावर विरोधकांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा हल्ला २०० कोटींचा व्यवहार असलेल्या गोदाम विकासाच्या वादातून झाल्याचे तपासाअंती समोर आले. या घटनेच्या ठिकाणी काही हल्लेखोरांनी पुढे जाण्यास रस्ता न सापडल्याने आपली दुचाकी तेथेच सोडून पळाले होते. त्यामुळे पोलिसांना हत्येचा कट रचणाºयांचा सुगावा लागण्यास मदत झाली. या घटनेतील मुख्य सूत्रधार व त्याचे तिघे साथीदार गुंड असून ते सातारा व पुणे भागातील प्रसिद्ध गँगस्टर आहेत. सोमनाथ चव्हाण (सोमाभाई), गौतम काशिनाथ शिंदे व हर्षद सुरेश येमकर (पुणे) अशी तिघांची नावे असून त्यापैकी गौतम व हर्षद या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे, तर सोमनाथ चव्हाण याचा पोलीस शोध घेत आहे.१३ नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडीच्हल्लेखोर व शार्पशूटर्स फरार झाले होते, तर कट रचणारे विरोधक देवदर्शनासह पर्यटनासाठी पंजाब, जम्मू-काश्मीर येथे निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून गुरुवारी मुख्य सूत्रधार सचिन घोडविंदे, शूटर महेश ऊर्फ महाराज मधुकर चांदिलकर व विनायक सुरेश चव्हाण या तिघांना अटक केली.च्शुक्रवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर.ए. सावंत यांनी १३ नोव्हेंबरपर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येच्या कटातील १४ जण फरार असून पडघ्यातील दोन राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारी