शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

भिवंडीतील अल्पवयीन युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

By नितीन पंडित | Updated: December 13, 2023 15:29 IST

पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचे उघड 

भिवंडी: काल्हरे येथे खाडी किनारी अपहरण करून अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरून पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात नारपोली पोलिसांनी या पूर्वी दोन जणांना ताब्यात घेतल्या नंतर पोलिस पथकाने अनिकेत तुकाराम खरात,शिवाजी धनराज माने,संतोष सत्यनारायण ताटीपामुल या तिघा जणांना ताब्यात घेतल्याने अटक आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे.अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी काल्हेर येथे राहणारा १६ वर्षांचा योगेश रवी शर्मा यास मोबाईल फोन करून काल्हेर खाडी किनारी बोलावून त्याची चाकू व कोयत्याने वार करून हत्या केली.त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तेथील निर्जन स्थळी आगोदरच खड्डा खोदून ठेवलेल्या ठिकाणी योगेशचा मृतदेह पुरून ठेवला होता.

या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत,पोलीस निरीक्षक प्रमोद कुभार,पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे,शरद पवार,पोलिस उपनिरीक्षक रोहन शेलार,पोलिस पथकातील निता पाटील, भरत नवले, सांबरे, पाटील,सहारे, जाधव,नांगरे,देसले यांनी कामतघर येथून आयुष झा व मनोज टोपे यांना तब्बल बारा दिवसांनंतर ताब्यात घेतले.त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी हत्येची कबुली देत मृतदेह ज्या ठिकाणी पुरून ठेवला होता ती जागा दाखवली.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता कामतघर येथील ब्रह्मानंद नगर येथे सहा महिन्या पूर्वी हत्या करणाऱ्या युवकांसोबत हत्या झालेल्या युवकाच्या गटाची हाणामारी झाली होती.या हाणामारीचा राग मनात ठेऊन पूर्ववैमनस्यातून हत्या करण्याचा कट रचून योगेश यास भांडण मिटविण्यासाठी बोलावून ही हत्या केली.

नारपोली पोलिसांनी दोन पथक बनवून राज्यात इतर ठिकाणी फरार झालेले अनिकेत तुकाराम खरात वय २३ वर्षे ,शिवाजी धनराज माने वय २३ वर्षे व संतोष सत्यनारायण ताटीपामुल वय १९ वर्षे या तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.या हत्येच्या गुन्ह्यात अजून काही आरोपी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.तर हत्या झालेला योगेश हा समाज माध्यमांवर उज्जैन येथील कुप्रसिद्ध दुर्लभ कश्यप याचा फॉलोअर असल्याचे समोर आल्याने त्यामधून प्रभावित होत तो काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांसोबत वावरत होता त्या  दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत असे शेवटी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले .

टॅग्स :bhiwandiभिवंडीArrestअटक