शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात लिफ्टमध्ये अडकलेल्या पाच जणांची सुखरुप सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: November 5, 2023 22:06 IST

घोडबंदर रोड मानपाडा मधील घटना

ठाणे : घोडबंदर रोडवरील मानपाडा,या ठिकाणी असलेल्या तळ अधिक १५ मजली दोस्ती इम्पिरिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती अचानक लिफ्ट बंद पडली. त्या लिफ्टमध्ये पाच व्यक्ती अडकल्याची घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

अडकलेल्या पाचही ४० ते ४५ मिनिटात सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्यामध्ये इमारतीमधील राहणारे एका कुटुंबातील चौघांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

दोस्ती इम्पिरिया या इमारतीच्या लिफ्टमध्ये पाच व्यक्ती अडकल्याची माहिती चितळसर पोलिसांकडून मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. लिफ्टमध्ये अडकलेल्या ५४ वर्षीय अब्दुल जब्बार , रेहाना शेख (४५), फैज जब्बार (७ ), फैजान जब्बार (५) आणि एका ४० वर्षीय अनोळखीसह पाच जणांची सुटका करण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.