शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर ट्रक चालकाचा खून करणारे पाचजण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:43 IST

भिवंडी : अहमदाबाद महामार्गावर ट्रकचे चालकासह अपहरण करून मुंबई- नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील वडपे बायपास येथील शालीमार हॉटेल समोर ...

ठळक मुद्देअहमदाबाद महामार्गावर ट्रकचे चालकासह अपहरणट्रकमधील माल विकण्यास चालकाने विरोध केल्याने हत्याहत्या करणाऱ्या पाचजणांच्या टोळीस पोलीसांनी केले गजाआड

भिवंडी : अहमदाबाद महामार्गावर ट्रकचे चालकासह अपहरण करून मुंबई- नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील वडपे बायपास येथील शालीमार हॉटेल समोर चालकाचा पाचजणांच्या टोळक्यांनी खून केला. मृत ट्रकचालकांच्या वारसाचा शोध घेत पोलीसांनी बारा दिवसांत पाच आरोपींना अटक करून त्यांना गजाआड केले. त्यांना कोर्टात हजर केले असता सोळा मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश भिवंडी न्यायालयाने दिले आहेत.सुभाष छबीराज यादव(४५)असे मृत ट्रक चालकाचे नांव असुन तो उत्तरप्रदेश आजमगढ येथील परशुरामपूर मध्ये रहात होता. बारा दिवसांपुर्वी त्याचा मृतदेह बंद ट्रकमध्ये चालकाच्या कॅबीनमध्ये आढळून आला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पोलीसांनी आरोपींचा तपास सुरू केला होता. दरम्यान मृत चालकाचा सहकारी चालक मोहम्मद अजमल उर्फ अकमल वसी अहमद शेख (३६)यांस तलासरी येथुन ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने चौघांच्या मदतीने सुभाष यादव याची हत्या केल्याची कबुली पोलीसांना दिली.आरोपी चालक मोहम्मद अजमल याने त्यांच्या साथीदारांशी संगनमत करून सिमेंटचे पेव्हर ब्लॉक घेऊन लोणावळ्यास जाणारा ट्रक मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाट मार्गावर अडविला. तेथुन पाचजणांनी ट्रकचे चालकासह अपहरण करून त्यास भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावर आणले. तसेच या टोळक्याने ट्रकमधील सिमेंटचे ब्लॉक काळ्या बाजारात विकण्याचे ठरविले.त्यांना ट्रक चालक सुभाष यादव याने विरोध केला.त्यामुळे त्याच्या डोक्यावर लोखंडाच्या टॉमीने प्रहार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यास ट्रकमधील चालकाच्या कॅबीनमध्ये टाकून सर्व पसार झाले. मात्र आरोपी मोहम्मद अजमल याने ही हकीकत सांगीतल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी गोवंडीतील मोहम्मद शाकीर रियाज अहमद शेख (३०),मोहम्मद कैफ अहमद अल्ताफ शेख(३३), भिवंडीतील गैबीनगर येथुन जहान जेब अमीन खान(२३) तर अन्सारनगर येथुन मोहम्मद इम्रान अलील खान(३५) यांना अटक केली. आज रविवार रोजी पाचही जणांना न्यायालयांत हजर केले असता न्यायालयाने १६ मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेवरून महामार्गावरील गुन्हेगारी उघडकीस आली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून