शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जादा व्याजाचे पैसे देण्याचे आमिष : एक कोटी ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:13 IST

? जादा व्याजाचे आमिष दाखवून नऊ जणांची एक कोटी ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश मोरे (५२, रा. खडकपाडा, कल्याण) याच्यासह पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांची दहा वेगवेगळी बँक खातीही सील केल्याचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाईदिल्ली आणि गुजरात येथून केली आरोपींना अटक कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे : अल्पावधीत जादा व्याजाचे आमिष दाखवून नऊ जणांची एक कोटी ४० लाखांची फसवणूक करणाºया प्रकाश मोरे (५२, रा. खडकपाडा, कल्याण) याच्यासह पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी गुरुवारी दिली. मोरे याच्या उर्वरित साथीदारांना दिल्ली आणि गुजरात येथून अटक केली असून त्यांची वेगवेगळी १० बँक खाती सील करण्यात आली आहे.रेडरॉकगेम, टिप्सझोन अ‍ॅडवायजरी प्रा.लि., क्रिप्टो ट्रेड डब्ल्यूएस आणि जिआ कुल आदी बनावट कंपन्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून ठाण्यातील एका रहिवाशाला ११ लाख ५० हजारांची गुंतवूणक करण्यास ठाण्याच्या वाघबीळ येथील संदीप पाटील (४२) याने भाग पाडले. एका योजनेनुसार सात लाख ५० हजारांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना गुंतवणुकीतील रकमेच्या एक टक्का रक्कम दिवसाला फायदा म्हणून २०० दिवस दिले जातील, असा दावा करण्यात आला होता. त्यानुसार, त्यांना २०० दिवसांमध्ये २१ लाख रुपये कंपनीकडून देण्यात येणार होते. त्यांनी आणखी असेच गुंतवणूकदार कंपनीला मिळवून दिले, तर त्या गुंतवणूकदारांच्या रकमेच्या तीन टक्के रक्कम त्यांना रॉयल्टी म्हणून २०० दिवसांपर्यंत दिली जाणार होती. आपल्याला मोठा व्याजाचा परतावा मिळणार, या आशेपोटी त्यांनी ११ लाख ५० हजारांच्या रकमेची गुंतवणूक केली. हा प्रकार १२ एप्रिल २०१८ ते २२ फेब्रुवारी २०१९ या काळात घडला. याच काळात त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना त्यांचे पैसेही परत मिळाले नाही. शिवाय, त्यांना भेटण्यासही संदीप पाटील आणि त्याच्या साथीदारांनी टाळाटाळ केली. या गुंतवणूकदारासह नऊ जणांची एक कोटी ४० लाख २७ हजार ५०० रुपयांची या कंपन्यांमधील भामट्यांनी फसवणूक केल्याचे आढळले. याप्रकरणी २९ मार्च २०१९ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण यांच्या पथकाने मुख्य आरोपी टीप्स झोन अ‍ॅडव्हायजरी प्रा.लि. या कंपनीचा संचालक प्रकाश मोरे याला कल्याण येथून अटक केली. त्याच्याच चौकशीतून पाटील याला १ एप्रिल रोजी अटक केली. त्यापाठोपाठ गुजरात येथील ज्याच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले तो उमंग शाह (२७, रा. सुरत, गुजरात) आणि अजय जरीवाला (४३, रा. सुरत, गुजरात) या दोघांना गुजरात येथून ३ एप्रिल रोजी अटक केली. दिल्ली येथून रितेश पटेल (३५, रा. बलसाड, गुजरात) याला ४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. यातील प्रकाश आणि संदीप या दोघांना ८ एप्रिलपर्यंत तर उमंग, अजय आणि रितेश तिघांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक विजय पवार, उपनिरीक्षक महेंद्र भामरे, उपनिरीक्षक एस.आर. गावंड, डी.बी. सरक आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींची वेगवेगळ्या बँकांमध्ये असलेली १० खाती आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. 

जादा व्याजाचे आमिष दाखवून बनावट कंपन्या गुंतवणूकदारांना फसवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कोणत्याही आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. संपूर्ण खातरजमा करूनच आपली रक्कम गुंतवावी.संजय जाधव, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर---------------------

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी