शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मौखिक तपासणीदरम्यान सापडले कर्करोगाचे पाच रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 2:36 AM

राज्यभरात डिसेंबर महिन्यात मौखीक (मुख स्वास्थ) आरोग्य तपासणी मोहिम राबवण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला कर्करोग पूर्व लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेतला.

पंकज रोडेकर ठाणे : राज्यभरात डिसेंबर महिन्यात मौखीक (मुख स्वास्थ) आरोग्य तपासणी मोहिम राबवण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला कर्करोग पूर्व लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेतला. त्या रुग्णांची तपासणी पूर्ण झाली असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात ५जणांना कर्करोग झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मौखिक आरोग्य तपासणी ही मोहीम १ ते ३१ डिसेंबर दरम्यान हाती घेतली होती. त्यामध्ये ३० वर्षावरील स्त्री व पुरूषांची तपासणी केली. त्यामध्ये, प्रत्यक्ष २ लाख ६० हजार, अप्रत्यक्ष २ लाख ३५ हजार लोकांची अशी ४ लाख ९५ हजार लोकांची तपासणी केली. ही आकडेवारी ग्रामीण आणि शहरी भागातील असून त्या केलेल्या तपासणीत अंदाजे ५ हजार लोकांना कर्करोग पूर्व लक्षणे असल्याचा संशय वर्तवला गेला होता. त्यांची विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनेंतर्गत केलेल्या दुसऱ्या टप्पातील तपासणीत ४५० जणांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसत असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे त्यांच्यावर द्वितीय पूर्ण तपासणी केल्यावर त्यामध्ये ७ जणांना कर्करोग असल्याची दाट शक्यता दिल्याने त्यांची बॉयोप्सी केली. त्यामध्ये ५ जणांना कर्करोग झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.मौखीक आरोग्य तपासणीत सुमारे पाच हजार जणांमध्ये कर्करोग पूर्व लक्षणे आढळून आले होते. त्यापैकी ५ जणांना आता कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण, ज्या ४५० जण संशयित म्हणून पुढे आले आहेत. त्यांचीही यापुढे नियमित तपासणी केली जाणार आहे. - डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे

टॅग्स :cancerकर्करोग