शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तिघा नायजेरीनसह पाचजणांना अटक

By admin | Updated: August 29, 2015 23:11 IST

सोशल नेटवर्कच्या माध्यमातून भारतामध्ये भागीदारीत व्यवसाय करायचे सांगून हैदराबादमधील मित्रांना लाखोंचा चुना लावणाऱ्या तिघा नायजेरीनसह पाच जणांना ठाणे पोलिसांनी अटक

ठाणे : सोशल नेटवर्कच्या माध्यमातून भारतामध्ये भागीदारीत व्यवसाय करायचे सांगून हैदराबादमधील मित्रांना लाखोंचा चुना लावणाऱ्या तिघा नायजेरीनसह पाच जणांना ठाणे पोलिसांनी अटक करून त्यांना हैदराबाद पोलिसांच्या हवाली केले. यासाठी हैदराबादचे पथक शनिवारी ठाण्यात आले होते.नायजेरीन टेरी ओनएम जोसेफ याने सुमारे १० महिन्यांपूर्वी फेसबुकवर हैदराबादमधील टी.प्रविणकुमार यांची ओळख झाली. याचदरम्यान, त्याने प्रविणकुमारला भारतामध्ये व्यवसाय करावयाचा असून हिरे आणि सोन्याची बिस्किटे पाठवतो असे सांगून ते कस्टममधून सोडवण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार, त्याने ११ लाख रुपये भरले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने हैदराबादमध्ये आत्महत्या केली. याचदरम्यान जोसेफने त्याचा मित्र एन. आर. सदाशिवा याच्याशी संपर्क साधून त्याची देखील पावणे चार लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी सदाशिवाने हैदराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचदरम्यान, जोसेफच्या सांगण्यावरून सदाशिवाने डोंबिवलीतील एका बँकेत ५० हजार रुपये भरल्याचे समोर आल्यावर त्यांनी ठाणे पोलिसांना शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांच्या पथकाने खातेदार लक्ष्मण माळीला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून महेश रजपूत उर्फ राजेश गुप्ता तसेच नायजेरीन फ्रॅक, व्हॅलनटाईन आणि केव्हीन यांना अटक केली. त्यांना ठाण्यात आलेल्या हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात शनिवारी दिले. (प्रतिनिधी) पोलिसांचे आवाहन गुप्ताने बॅकेचे कर्ज मिळून देतो अशी जाहिरात दिली होती. त्यानुसार गरीब घरातील माळीने त्याच्याशी संपर्क केला होता. मात्र, खात्यावर पैसे देवाण-घेवाणीत मोठी रक्कम दिसत नसल्याने कर्ज देता येत नाही असे त्यांना सांगितले. तरी पण कर्ज मिळवून देतो. त्यानुसार, तो त्याने जाहिरातीस भुललेल्या नागरिकांकडून रक्कम जमा करण्यासाठी माळीच्या खात्याचा वापर सुरू केला. त्याबदल्यात माळीला दोन टक्के रक्कम देत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.