शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धेला पाच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 00:19 IST

पोलीस असल्याची बतावणी करीत एका ६०उ वर्षीय वृद्धेला एका त्रिकुटाने पाच लाखांचा गंडा घातल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देतीन भामटयांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखलपाच लाखांचा गंडा घातल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस असल्याची बतावणी करीत एका ६० वर्षीय वृद्धेला एका त्रिकुटाने पाच लाखांचा गंडा घातल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तीन भामटयांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.कळव्यातील पारसिकनगर भागात राहणारी ही महिला १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भगवान शंकर मंदिरात दिवा लावून परत घरी जात होती. अमृतआंगण सोसायटीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरुन ती जात असतांना ३५ ते ४० वयोगटातील तीन भामटयांनी तिला गाठले. आपण पोलीस असल्याची तिला त्यांनी बतावणी केली. नंतर तिच्याकडील दहा तोळे वजनाचे चार लाखांचे सोन्याचे दागिने, एक लाख २० हजारांचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे मणी असा पाच लाख २० हजारांचा ऐवज बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून लंपास केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रुती शिंदे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी