शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साथीचे रोग! पाच डॉक्टरांना डेंग्युची लागण, सोनोग्राफी सेंटरवर वाढला ताण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 18:56 IST

ठाणे शहरात डेंग्यू, मलेरीया आदींच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

ठाणे - शहरात साथीच्या रोगांची साथ सुरू असतानाच आता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयातील तब्बल पाच डॉक्टरांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व डॉक्टर सोनोग्राफी विभागात कार्यरत असून आता या पाचही डॉक्टरांवर उपचार सुरु आहेत. मात्र, त्यामुळे सोनोग्राफी विभागावरील ताण वाढला असून दिवसाला केवळ 100 च्या आसपासच सोनोग्राफी केली जात असल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे.

ठाणे शहरातडेंग्यू, मलेरीया आदींच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु यावर उपाय योजना करण्यात पालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग कुठेतरी कमी पडत असल्याचेच दिसत आहे. एकीकडे सर्वसामान्य ठाणोकरांना डेंग्युने सतावले असतांनाच आता पालिकेचेच डॉक्टर डेंग्युच्या विळख्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डेंग्युने पाच डॉक्टर फणफणले असून त्यांच्यावर आता याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्क्रीनंगमध्ये या पाचही डॉक्टरांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, याचा परिणाम मात्र सोनोग्राफी विभागावर झाल्याचे दिसून आले आहे. सोनोग्राफी विभागात सात डॉक्टर कार्यरत होते. त्यातील पाच डॉक्टरांवरच आता उपचार सुरू असल्याने त्याचा परिणाम सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. कळवा रुग्णालयात दिवसाला रोज 200 ते 250 सोनोग्राफी होत होत्या. परंतु आता या विभागात दोनच डॉक्टर असल्याने त्यांच्यावरील ताण वाढला असून त्यांच्याकडून केवळ दिवसाला 100 च्या आसपासच सोनोग्राफी होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. परंतु रुग्णालयात मनुष्यबळ कमी असल्याने तशा प्रकारचे प्रशिक्षण असलेल्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळेच आता रुग्णांचेही या निमित्ताने हाल सुरु झाले आहे. 

दरम्यान मागील दिड वर्षापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे कळवा रुग्णालयातील डॉक्टरांना डेंग्युची लागण झाल्याचा प्रकार घडला होता. तसेच एका डॉक्टराचा मृत्युही झाला होता. परंतु, आता पुन्हा अशा प्रकारे पाच डॉक्टरांना डेंग्युची लागण झाल्याने पालिकेचा आरोग्य विभाग या निमित्ताने पुन्हा एकदा रडारवर आला आहे. सोनोग्राफी सेंटर आणि आजूबाजूच्या परिसरात तीन दिवसात दोन वेळा फवारणी करण्यात आली आहे. तसेच इतर उपाय योजना करण्यात आल्याची माहिती ठाणो महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरदास गुजर यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेdengueडेंग्यूdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल