शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

जिल्ह्यात पाच कोटींची भातखरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:29 IST

आदिवासी विकास महामंडळ : शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सहा केंद्रांची केली व्यवस्था

भातसानगर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत आतापर्यंत जवळजवळ पाच कोटी रूपयांच्या दरम्यान भातखरेदी करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील सहा केंद्रांवर लाखो रुपयांची खरेदी झाली आहे. यावर्षी जिल्ह्यातील आठ भातखरेदी केंद्रांवर २७ हजार १३४.१७ क्विंटल भातखरेदी करण्यात आली असून त्याची किंमत चार कोटी ९२ लाख ४९ हजार ५३४.९५ रुपये इतकी आहे.शहापूर तालुक्यातील सहा केंद्रांवर भातखरेदी झाली. यामध्ये आटगाव केंद्रात ७५ लाख एक हजार ६६७.२५ रु पयांचा ४१३३.१५ क्विंटल भातखरेदी करण्यात आला आहे. किन्हवली केंद्रात ५७ लाख ४१ हजार २६.५० रु पयांचा तीन हजार १६३.१० क्विंटल, अघई केंद्रात १२ लाख ३५ हजार ९६०.५५ रु पयांचा ६८०.९७ क्विंटल, चौंढा या केंद्रात २३ लाख ९४ हजार ९६५ .१० रु पयांचा सात हजार १४६.७५ क्विंटल, खर्डी केंद्रात एक कोटी २९ लाख ७१ हजार ३५१.२५ रुपयांचा ७१४६.०५ क्विंटल, मढ-अंबरजे या केंद्रात एक कोटी ५८ लाख ९५ हजार ८६०.७५ रु पयांचे आठ हजार ७५८.०५ क्विंटल तर मुरबाड येथील धसई येथील केंद्रात ३५ लाख आठ हजार ७०३ रु पयांचा एक हजार ९३३ क्विंटल भातखरेदी करण्यात आली आहे.‘अ’ ग्रेड असणाºया भाताला एक हजार ८३५ तर साधारण धान्यासाठी एक हजार ८१५ रु पये हमीभाव देण्यात आला आहे.एकंदरीत ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत चार कोटी ९२ लाख ४९ हजार ५३४ रुपयांची २७ हजार १३४ क्विंटल इतकी खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी ती याहीपेक्षा अधिक होती.त्यामानाने ती कमी आहे. यावर्षी अधिक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात भातपिके कुजल्याने खरेदीवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसूनआले. सहा केंद्र सुरू झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसामुळे आमचे खूप नुकसान झाले असे केंद्राच्या ठिकाणी भात विकण्यासाठी आलेल्या शेतकºयांनी सांगितले.सध्या शहापूर तालुक्यातील भातखरेदी केंद्रांवर बºयापैकी भातखरेदी सुरू आहे. अनेक समस्यांचा सामना करूनही खरेदी केली जात आहे. - एस.एल. राजुरे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, शहापूरयावर्षी अधिक पाऊस पडल्याने भातपिकांचे मोठे नुकसान झाल्याने भातखरेदी अतिशय कमी झाली आहे.- काशिनाथ पष्ठे,जि.प. सदस्य