शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यास पाच नगरसेवकांनी केला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 00:54 IST

२७ गावांची सुनावणी : राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले लक्ष

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांप्रकरणी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही बेलापूर येथील कोकण भवन कार्यालयात कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्याकडे सुनावणी झाली. या वेळी दोन नगरसेवक व तीन नगरसेविकांनी त्यांना २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका नको, अशी हरकत नोंदविली. दरम्यान, दोन दिवसांच्या सुनावणीचा अहवाल दौंड सरकारला सादर करणार असून, सरकार आता काय निर्णय घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

कोकण विभागीय आयुक्तांकडे बुधवारी हरकती सूचना नोंदवण्यासाठी २७ गावांतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्या वेळी प्रत्येक गावांचे सरपंच, उपसरपंचांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. गुरुवारीही सुनावणीचा दिवस होता, त्यामुळे गुरुवारीही पुन्हा काही ग्रामस्थ कोकण भवनला पोहोचले. मात्र, गर्दी टाळण्यासाठी शीघ्र कृती दल मागविण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी ज्यांनी हरकती सूचना नोंदविल्या, त्यांना गुरुवारी मज्जाव करण्यात आला.

भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, विनोद काळण, शिवसेनेच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे, रूपाली म्हात्रे, पूजा म्हात्रे यांनी स्वतंत्र नगरपालिका नको असल्याचे निवेदन दौंड यांना सादर केले. भोईर यांनी सांगितले की, काही कारणास्तव अन्य तीन नगरसेविका हरकती नोंदविण्यासाठी आलेल्या नाहीत. २७ गावांतील कचरा महापालिका उचलते. पाणीपुरवठा योजना केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्यामुळे महापालिकेत राहून विकासच झाला नाही, अशी ओरड करणे चुकीचे आहे. राज्यात ही एकमेव महापालिका अशी आहे की, गावे वगळल्यानंतर ती पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली. ७ सप्टेंबर २०१५ ला काढलेल्या अधिसूचनेवर पुन्हा हरकती सूचना चार वर्षांनंतर घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला.

या वेळी मनसेचे आ. राजू पाटील यांनी या पाचही नगरसेवकांचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर २०१५ रोजी काढलेल्या अधिसूचनेकरिता आॅक्टोबर २०१५ मध्ये हरकती सूचना मागविल्या होत्या. त्याच हरकती सूचनांचा विचार केला जावा. नव्याने आलेल्या हरकती सूचना केवळ समोर ठेवण्यास हरकत नाही.सर्वपक्षीय संघर्ष समितीनेही घेतली हरकतसर्व पक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, गजानन मांगरुळकर, दत्ता वझे, विजय भाने, वासुदेव गायकर, विठ्ठल व अरुण वायले यांनी पाचही नगरसेवकांच्या मागणीला पुन्हा हरकत घेण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :MNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv Senaशिवसेना