शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाच घरफोड्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:41 IST

घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पाच अट्टल आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये त्यांनी जवळपास १३ गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

ठाणे : घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पाच अट्टल आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये त्यांनी जवळपास १३ गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.एका घरफोडीच्या प्रकरणाचा तपास करत असताना ठाण्यातील वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना काही अट्टल घरफोड्यांची माहिती मिळाली. त्यानुसार, मालाड येथील राजेश मुग्रेश शेट्टीयार ऊर्फ शेट्टी, विरार येथील संजू तंगराज शेट्टी आणि मुंबईतील व्यंकटेश महादेव शेट्टीयार ऊर्फ टकला ऊर्फ कट्टप्पा यांना पोलिसांनी ७ जून रोजी अटक केली. तिन्ही आरोपींना ठाणे, मुंबईतील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वीही अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर पडले होते. बाहेर पडताच त्यांनी ठाणे, मुंबई परिसरात पुन्हा घरफोड्या सुरू केल्या. श्रीनगर पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या एका गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आहे. या गुन्ह्यातील काही सोन्याचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २.५० लाखाची घरफोडी केली होती. या गुन्ह्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. राजेश मुग्रेश शेट्टीयार याच्याविरुद्ध आतापर्यंत वीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती जयराज रणवरे यांनी दिली.वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये पोलिसांनी नालासोपारा येथील कन्हय्यालाल भवरलाल सुथार आणि अहमदाबाद येथील सचिन ऊर्फ जगदीश लक्ष्मण फराट यांना ९ जून रोजी अटक केली. कन्हय्यालाल भवरलाल सुथार याच्याविरुद्ध अंधेरी, चारकोप आणि नालासोपारा पोलीस ठाण्यांमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी सराईत आहेत. गुजरातमध्ये त्यांनी १३ घरफोड्या केल्या आहेत. त्यापैकी तीन घटनांमध्ये त्यांनी सराफा दुकानांमध्ये चोरी केली होती. आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Arrestअटकcrimeगुन्हे