शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये वीज कोसळून मच्छीमाराचा मृत्यू, ६ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 15:43 IST

यामुळे काही घरातील विजेची उपकरणं बंद पडली तर वीज पुरवठा खंडित झाला होता

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील पातान बंदर समुद्र किनारी प्रातःविधी साठी गेलेल्या मच्छीमारांवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ६ जण किरकोळ जखमी झाले. यामुळे काही घरातील विजेची उपकरणं बंद पडली तर वीज पुरवठा खंडित झाला होता. स्टॅनी इनास अदमनी ( ६६ ) असे निधन झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे . 

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन - पाली - चौक परिसरातील बहुतांश मच्छीमार समुद्र किनारी प्रातः विधीसाठी जातात . पातान बंदर येथे राहणारे स्टॅनी देखील घराच्या मागील समुद्र किनारी सवयी प्रमाणे सकाळी साडे सहाच्या सुमारास प्रातःविधीसाठी गेले होते . त्यावेळी अन्य मच्छीमार देखील प्रातःविधी आदी साठी आले होते . 

वादळ - विजेचा कडकडाट सुरु असतानाच अचानक प्रचंड आवाज होऊन वीज कोसळली .  स्टॅनी यांच्या वर वीज पडल्याने ते जागीच मरण पावले . तर त्या ठिकाणी असलेले रोहन राजेश पोशापीर , गिल्डर खोपटकर , राजेश पिला, सनी पिला आदी जखमी झाले .वीज पडताच सर्वांचा जिवाच्या भीतीने थरकाप उडाला . परंतु पावसाची रिमझिम व किनारा ओला असल्याने  काहींना विजेचे झटके बसले . आवाज तर इतका मोठा होता कि कानठळ्या बसल्या . तासभर तर काहींचे कान सुन्न झाले होते . 

जखमींना जमेल तसे लगतच्या डॉक्टारां कडे उपचारासाठी नेण्यात आले . मच्छीमार नेते बर्नाड डिमेलो यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला माहिती देत आवश्यक मदतकार्य सुरु केले . तहसीलदार अधिक पाटील यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनेचा आढावा घेऊन शासना कडून  शक्य ती मदत करण्याचे निर्देश दिले . उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीणकुमार साळुंके यांनी घटना स्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . 

वीज कोसळल्याने येथील काही घरां मधील विजेची उपकरणं बंद पडली . तर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता .  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .  उत्तन परिसरातील मच्छीमारांनी समुद्र किनारी उघड्यावर प्रातःविधी साठी जाऊ नये असे आवाहन महापालिकेचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांनी केले आहे .