शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनसाठी मत्स्यविभागाचे स्वतंत्र परवाना कार्यालय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 20:15 IST

भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक परिसरातील मच्छीमारांसाठी मत्स्यविभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि मत्स्य विभागाचे आयुक्त अरुण विंधले यांनी उत्तनच्या पाली येथे आयोजित मच्छीमारांच्या मेळाव्यात दिली.

<p>मीरा रोड - भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक परिसरातील मच्छीमारांसाठी मत्स्यविभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि मत्स्य विभागाचे आयुक्त अरुण विंधले यांनी उत्तनच्या पाली येथे आयोजित मच्छीमारांच्या मेळाव्यात दिली. मेळाव्यात मच्छीमारांना शासनाच्या विविध योजना, मासेमारीदरम्यान घ्यायची काळजी, कांदळवनाचे महत्त्व आदी विविध विषयांची माहिती व मार्गदर्शन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. मच्छीमारांना मासेमारीचे परवाने व बोट नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने पाली येथील उत्तन मच्छीमार व वाहतूक सोसायटीच्या मदर तेरेसा सभागृहात मत्स्य व्यवसाय विभाग व मेरिटाइम बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मच्छिमार मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात उपस्थित मत्स्य व्यवसाय विभागाचे सहआयुक्त राजेंद्र जाधव व विनोद नाईक, प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे, उपायुक्त युवराज चौघुले, सहाय्य्क आयुक्त दिनेश पाटील व भूषण पाटील, परवाना अधिकारी राजेश पाटील , अतुल साठे, तटरक्षक दलाच्या यामिनी गोदुले व मुकेश कुमार, सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंकेसह विविध विभागाचे अधिकारी आदींनी मच्छीमारांना मासेमारी, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी, विविध योजना, कांदळवनाचे महत्व आदी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.नवीन जेट्टी मंजूर झाली असून, त्यासाठी 42 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्याचे काम येत्या दिवाळीत सुरू होईल. पाली येथे मच्छीमारांसाठी डिझेल पंप मंजूर झाला आहे. मच्छीमारांसाठी समुद्रात असलेला जुना दिशादर्शक दिवा ( दीपस्तंभ ) बदलून नवीन दिवा मंजूर झाला आहे, असे खा . विचारे यांनी सांगितले. ओली व सुकी मासळी खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी मच्छीमारांचे कष्टाचे पैसे थकवले असून पोलिसांनी त्यासाठी विशेष पथक तयार करून व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी केली.

मासेमारी बोटीवरती घेण्यासाठी चौक व डोंगरी येथे दोन रॅम्प मंजूर झाले असून, एकाचे काम पूर्ण झाले आहे. रो रो सेवा मंजूर झाली आहे. शासनाच्या नीलक्रांती योजने अंतर्गत अनेक सोयी सुविधा असून त्याची माहिती मच्छीमारांना नियमित दिली जाणार आहे. उत्तनच्या मच्छीमारांना परवान्यांसाठी आता पालघरला खेपा माराव्या लागणार नाहीत . उत्तनसाठी स्वतंत्र कार्यालयाची मंजुरी झाली असून येथे पूर्णवेळ परवाना अधिकारी दिला जाणार असल्याचे विचारे यांनी सांगितले.या मेळाव्याला माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा, माजी महापौर कॅटलीन परेरा, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, विरोधी पक्षनेते राजू भोईर, नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला बगाजी, अनिता पाटील, दीप्ती भट, नगरसेवक प्रवीण पाटील, एलायस बांड्या, जयंती पाटील, अनंत शिर्के, हरिश्चंद्र आमगावकर, शिवसेना मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी नगरसेविका शबनम शेख, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंदसह विल्यम गोविंद, विविध मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी, जमातीचे पाटील, गाव पाटील, मच्छीमार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मच्छीमारांना मासेमारीचे परवाने व बोट नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच मच्छीमारांना समुद्रात कोणत्याही प्रकारचा धोका, अडचण निर्माण झाल्यास तातडीने त्याचा संदेश तटरक्षक दलास देता यावा म्हणून सुरक्षा यंत्रांचे वाटप अर्ज भरण्याची प्रक्रिया करून केले जाणार आहे. सध्या शंभर यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या परिसरात सुमारे साडेसातशे मच्छीमार बोटी असून मासेमारी परवाना आदीसाठी पालघर येथे एकच कार्यालय असल्याने मच्छीमारांना खूपच त्रास सहन करावा लागतोय. पालघर आता वेगळा जिल्हा झाल्याने उत्तन येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.