शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावरील टोलनाक्यावर 'फास्टॅग'चा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 12:44 IST

मुंबई-नाशिक महामार्गवरील घोटी, पडघा  टोलनाक्यावर शनिवारी ( ता. १५ ) मध्यरात्री नंतर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

- शाम धुमाळ कसारा- मुंबई-नाशिक महामार्गवरील घोटी, पडघा  टोलनाक्यावर शनिवारी ( ता. १५ ) मध्यरात्री नंतर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यामुळे टोल नाका महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातच अधिकच्या विलंबाने नाशिक मार्गे मुंबईकडे खासगी वाहनाने जाणाऱ्या एका प्रवाशास शनिवारी  दुपारी १ वाजताच्यादरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने आपला  प्राण गमवावा लागला. मनोहर भिसे (वय 51 रा. चेंबूर,मुंबई ) असे प्रवाशाचे नाव असून, यावेळी टोल प्रशासनाची रुग्ण वाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. दरम्यान मध्यरात्रीपासून पोलिसांचा खडा पहारा दोन्ही टोलनाक्यावर लावण्यात आला होता.अधिकच्या वेळेमुळे व नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे वाहन चालकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक वेळा वाहन चालक व टोल प्रशासन यांच्यात वाद व  हमरीतुमरी झाली, तेव्हा पोलिसांच्या मध्यस्तीनं वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले गेले. दरम्यान टोल कंपनीचे कामगार असलेल्या पडघा टोलवरील कर्मचारी प्रवासी व वाहन चालक याच्याशी कायम दादागिरीचे वर्तन करीत असल्याने एक दिवस या पडघा टोलनाक्यावर कायदा सुव्यवस्थेत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एकच लेन सुरू असल्याने दोन्ही बाजूला १ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे 3 दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. ‘वन नेशन वन टॅग’ ही संकल्पना राबवत देशभर फास्टॅग मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्वच वाहानांनी टोलनाक्यावर फास्टॅगद्वारेच ऑनलाइन आपला टोल भरणे अपेक्षित आहे.